Nirmala Sitharaman on Budget Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Announcement: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी ५ महत्वाच्या घोषणा, जाणून घ्या सविस्तर

5 Important Budget 2024 Announcement For Salaried Employee: अर्थसंकल्पामध्ये नोकरदार व्यक्तींसाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई: एनडीए सरकारचा काल अर्थसंकल्प सादर झालाय. या अर्थसंकल्पात नोकरदार व्यक्तींसाठी पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यात स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ, नवीन कर प्रणाली, कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील कर कपातीत वाढ, एक महिन्याचे वेतन आणि इंटर्नशिप या निर्णयांचा समावेश आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (NDA Goverment) यांनी काल २३ जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प २२०४-२५ सादर केला. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९५६ ते १९६४ या कालावधीत अर्थमंत्री म्हणून सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते. त्यांचा रेकॉर्ड मोडत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सात अर्थसंकल्प सादर केले आहेत. या अर्थसंकल्पात, निर्मला सीतारामन यांनी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि भरपूर संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा सांगितली. यामध्ये कृषी, रोजगार आणि कौशल्य आणि सेवांमधील उत्पादकता आणि लवचिकता यांचा समावेश आहे.

स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ केल्याची घोषणा केली. त्यांनी नवीन आयकर प्रणाली अंतर्गत पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मानक कपात ५० हजार रूपयांवरून ७५ हजार (Budget 2024) रूपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केलीय. जुन्या कर प्रणालीमध्ये मानक कपातीबाबत कोणताही बदल जाहीर केलेला नाही.

नवीन आयकर स्लॅब

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात चालू आर्थिक वर्षासाठी नवीन कर रेजिमेंट अंतर्गत आयकर स्लॅबमध्ये (Income Tax Provision) शिथिलता जाहीर केली. नव्या कर प्रणालीमध्ये ३ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. तर ३ ते ७ लाखापर्यंत ५ टक्के, तर ७ ते १० लाखांवर १० टक्के आणि १० ते १२ लाख उत्पन्नावर १५ टक्के, १२ ते १५ लाख रूपये उत्पन्नासाठी २० टक्के, तर १५ लाखांवर उत्पन्न असेल तर नवीन कर प्रणालीनुसार टॅक्स ३० टक्के भरावा लागणार आहे.

कौटुंबिक पेन्शनवरील कर सवलतीत वाढ

नोकरदार व्यक्ती आणि पेन्शनधारकांच्या चांगल्या आर्थिक स्थिरतेसाठी कौटुंबिक पेन्शन कपातीची रक्कम वाढवण्याची योजना जाहीर केलीय. नवीन कर प्रणाली अंतर्गत कपातीची रक्कम १५ हजारवरून २५ हजार रूपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे सुमारे ४ कोटी पगारदार व्यक्ती आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

एक महिन्याचे वेतन

निर्मला सीतारामन यांनी (Finance minister Nirmala Sitharaman) जाहीर केलं की, सरकार सर्व औपचारिक क्षेत्रात कामाच्या ठिकाणी नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींना एक महिन्याचं वेतन देणार आहे. सरकार ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योगदान म्हणून हस्तांतरित करेल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलीय.

सरकारकडून इंटर्नशिप

अर्थमंत्र्यांनी काल त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं, की सरकार टॉप ५०० कंपन्यांमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू करणार आहे. या योजनेत पाच वर्षांतील १ कोटी तरुणांचा समावेश असणार आहे. इंटर्नशिप करणाऱ्या तरूणांना दर महिन्याला ५ हजार रूपयांचा स्टायपेंड मिळणार आहे. तसेच ६ हजार रूपयांचा अतिरिक्त भत्ता मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT