Budget 2024 Saam Digital
Budget

Budget 2024 : मोदी सरकारचा 'कुर्सी बचाओ' अर्थसंकल्प! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची सडकून टीका

Budget 2024-25 Latest Update : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थ संकल्प म्हणजे 'कुर्सी बचाओ' अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

Sandeep Gawade

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. भाजप आणि मित्र पक्षांना अनुकूल असलेला हा अर्थसंकल्प 'कुर्सी बचाओ' अर्थसंकल्प असल्याची घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनामाची कॉपी आणि मागील अर्थसंकल्पातील त्याच त्याच गोष्टी मांडण्यात आल्याची टीकाही करण्यात आली आहे.

मोदी सरकारने तरुणांसाठी काँग्रेसची योजनेची नक्कल केली आहे. संपूर्ण देश महागाईने होरपळत आहे, मात्र अर्थसंकल्पात महागाईविरोधात कोणतीही पाऊले उचललेली नाहीत. केवळ काही अर्थसंकल्पात काही लोकांना आपली पदे वाचवण्यासाठी खूश करण्यात आलं आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

सीतारामन यांनी आज त्यांचा विक्रमी सलग सातवा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. नवीन करप्रणाली, बेरोजगारी, कृषी, याशिवाय सोने, चांदी, मोबाईल फोन आणि इतर वस्तूंवरील सीमाशुल्कात कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्या आली, त्याचा उल्लेख करायला राहुल गांधी विसरले नाहीत.

देशातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर मंगळवारचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताच्या आकड्यांपर्यंत पोहोचता आलं नाही. त्यामुळे एन चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चं सरकार स्थापन करण्यात आलं. मंगळवारच्या अर्थसंकल्पात याचं राज्यांना मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली. तसंच हा अर्थसंकल्प आणि कॉंग्रेसचा लोकसभा निवडणूक जाहिरनामा यात खूपच समानता असल्याचं जरयाम रमेश आणि पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

SCROLL FOR NEXT