FM Nirmala Sitaraman on Custom Duty applied on mobile phone and charger Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Impact: आनंदाची बातमी! मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, सीमाशुल्कात तब्बल 15 टक्क्यांची कपात; अर्थमंत्र्यांची घोषणा

Budget 2024 impact on custom duty: देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. यात मोबाईल फोन, चार्जरवरील सीमाशुल्कात १५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल फोनच्या किंमती कमी होणार आहेत.

Siddhi Hande

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे.या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आता मोबाईल, चार्जर आणि इतर गोष्टींवरील सीमाशुल्क (Custom Duty) १५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होणार आहेत.

मोबाईल, चार्जर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींवर कस्टम ड्युटी खूप जास्त होती. त्यामुळे या वस्तू खूप महाग होत्या. मात्र, आता मोबाइलवरील पीसीबीए (Printed Circuit Board Assembly) आणि मोबाईल चार्जरवरील बीसीडी (Basic Custom Duty)कस्टम ड्युटी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे आता ही उत्पादने स्वस्त होणार आहे. सरकार देशात मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन करण्याला प्राधान्य देणार आहे.

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारामन यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशांतर्गत मोबाईल फोनच्या उत्पादानात वाढ झाली आहे. आणि मोबाईल फोनच्या निर्यातीत १०० पट वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षात भारतातील मोबाइल उद्योग खूप विकसित झाला आहे. त्यामुळे मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सोने-चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमती आता स्वस्त होणार आहे. सोने-चांदीवरील ६ टक्के कस्टम ड्युटी ६ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे तर प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी ६.५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 31 व्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर भलंमोठं मधमाश्यांचं पोळं; रहिवाश्यांनी केला व्हिडीओ शेअर

मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Revati Lele Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; पुण्यातील राहत्या घरी झाला ग्रहमख विधी; PHOTO पाहा

Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले...

Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक

SCROLL FOR NEXT