Budget 2024  Saam Tv
Budget

Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार

Budget 2024 Date And Time: आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget Session 2024

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे हे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. आगामी अर्थसंकल्पाची (Budget 2024) सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे. हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणूकीपूर्वी सादर होत आहे. त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. (latest budget update)

आता अर्थसंकल्प कधी, किती वाजता सादर होणार, अर्थसंकल्पीय भाषण कुठे लाईव्ह बघायला मिळणार? याबद्दल जाणून घेऊ या. या अंतरिम अर्थसंकल्पात (Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा (Maharashtra)करणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अर्थमंत्र्यांना यंदाच्या निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद देखील अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळं मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नाही, असं अर्थतज्ज्ञांनी यापूर्वी सांगितलं होतं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्थसंकल्प कधी सादर होणार

दरवर्षी एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. नेहमीप्रमाणे यंदाही अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार (Budget 2024 Date And Time) आहेत. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे हा पूर्ण अर्थसंकल्प नाही. ही तात्पुरती आर्थिक योजना किंवा 'व्होट ऑन अकाउंट' आहे, अशी कल्पना अर्थमंत्र्यांनी दिलीय.

अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ही साधारणत: सकाळी ११ वाजता असते. यंदाही त्याचवेळेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प (Interiam Budget) १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकसभेत मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच यावर्षी अर्थसंकल्प सादर केला जातोय, त्यामुळे तो विशेष आहे.

अंतरिम अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्प ( Interiam Budget) कुठे, कोणत्या माध्यमांवर लाईव्ह बघायला मिळणार? असा प्रश्न सर्वांना आहे. तर दूरदर्शन, संसद टीव्ही, अर्थ मंत्रालयाचे YouTube चॅनेल, विविध वृत्तवाहिन्यांवर आपल्याला अर्थसंकल्प लाईव्ह बघायला मिळणार आहे.

या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण भागातील रस्ते, ‘मनरेगा’, पीएम विश्वकर्मा आणि (Budget Session 2024) पीएम किसान सन्मान निधी यासारख्या योजनांसाठी असणाऱ्या तरतुदीत वाढ केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने देखील उत्पादन आधारित सवलत योजनेचा विस्तार सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT