ओबीसी आरक्षण
ओबीसी आरक्षण  - Saam TV
ब्लॉग

OBC Resrvation - सरकारच्या ५० टक्क्यांच्या प्रस्तावाचे परिणाम काय.....

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक, साम टिव्ही मुंबई)

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण OBC Resrvation टिकविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचार विनिमय करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याचा प्रस्ताव शासनाने या बैठकीत मांडल्याचे सांगण्यात आले. याबाबत निर्णय घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. OBC Reservation issue what will be effects

काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाच्या मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे या समाजात मोठी नाराजी होती. आता यावर मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सरकारने सुचविल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा पाळली तर आरक्षित जागा कमी होणार आहेत -

  • - जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पालिका यातील जागा कमी होणार

  • - राज्यातील एकूण ५५६ आरक्षित जागा कमी होणार

  • - सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ४ हजार ४०४ जागा आरक्षित आहेत

  • - राज्य सरकारने ५० टक्क्यांची मर्यादा पाळायचा निर्णय घेतला तर ५५६ ने जागा कमी होऊन त्या ३ हजार ८४८ वर येणार

  • - ३४ जिल्हा परिषदांमध्ये सध्या ५३५ आरक्षित जागा आहेत त्यातील १२८ जागा कमी होऊन त्या ४०७ वर येणार आहेत

  • - ३५१ पंचायत समितीत सध्या १ हजार २९ जागा आहेत त्यातील २१६ जागा कमी होऊन त्या ८१३ वर येणार आहेत

  • - २७ महानगर पालिकांमध्ये सध्या ७४० आरक्षित जागा आहेत त्यातील ९ जागा कमी होऊन त्या ७३१ वर येणार आहेत

  • - ३६२ नगरपालिकांमध्ये सध्या २ हजार १०० जागा आरक्षित जागा आहेत त्यातील २०३ जागा कमी होऊन त्या १ हजार ८९७ वर येणार आहेत

    Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

SCROLL FOR NEXT