कल्याण सिंह Kalyan Sinh यांचा जन्म 6 जानेवारी 1932 रोजी उत्तर प्रदेशमधील UP अलिगड जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तेजपाल लोधी आणि आईचे नावसीता देवी. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासह त्यांनी राजस्थान Rajastan आणि हिमाचल प्रदेशचे Himacha Pradesh राज्यपाल पदही भुषवले आहे. Blog on kalyan singh passsing away
कल्याणसिंह यांची राजकीय कारकीर्द अतिशय धडाडीची होती. दोनवेळा मुख्यमंत्री आणि राज्यपाल पदापर्यंतचा त्यांचा प्रवास चांगलाच गाजला. आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. आता त्यांची तिसरी पिढी युपीच्या राजकारणात सक्रीय आहे.
कल्याणसिंह यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. युपीतील अतरौली विधानसभेचे सदस्य म्हणून अनेक वेळा काम केले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी १९६७ मध्ये अतरौली विधानसभा मतदारसंघातून कल्याण सिंह यांनी प्रथमच निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते १९८० पर्यंत ते अतरौली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले. मात्र १९८० च्या कॉंग्रेसचे अनवर खान यांनी निवडणुकीत कल्याण सिंह यांचा पहिल्यांदाच पराभव केला. परंतु कल्याणसिंह यांनी भाजपाच्या तिकीटावर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळविला. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कल्याण सिंह अतरौलीचे आमदार होते.
मुख्यमंत्री पदाचा प्रवास आणि बाबरी मशिद प्रकरण
१९९१ मध्ये कल्याण सिंह पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि दुसर्यांदा १९९७ मध्येदेखील त्यांनी युपीचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. कल्याणसिंह यांची मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ दोन गोष्टींसाठी आठवणीत राहतो. त्यातला पहिला म्हणजे अध्यादेशाची प्रत', त्या आधारे ते सुशासनाबद्दल बोलत असत. कल्याणसिंह यांच्या मंत्रीमंडळाच राजनाथ सिंह शिक्षणमंत्री होते. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्यांना तुरूंगात पाठविण्याचा कायदा करण्याच्या निर्णयामुळे कल्याणसिंह यांची एक धाडसी प्रशासक म्हणून ओळख निर्माण झाली. यूपीमध्ये परिक्षेत पुस्तक ठेवून कॉपी करणाऱ्यांसाठी हा काळ ओळखला जात होता. Blog on kalyan singh passsing away
कल्याणसिंह यांची कारकीर्द आठवणीत राहण्याचे दुसरे कारण म्हणजे, बाबरी मशिद प्रकरण. त्यासाठी ४२४ पैकी २२१ जागा मिळवूनही कल्याणसिंह यांनी मशिद पाडली गेल्यानंतर त्यांनी याची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी सरकार तर पडले, परंतु, संघाच्या विचारधारेच्या परिक्षेत कल्याणसिंह यशस्वी झाले. विशेष म्हणजे यामुळे केंद्रात त्यांचा नावलौकिकही वाढला.
२१ ऑक्टोबर १९९७ रोजी बहुजन समाज पक्षाने (बसपा) कल्याण सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. कल्याण सिंह आधीपासूनच कॉंग्रेसचे आमदार नरेश अग्रवाल यांच्या संपर्कात होते. त्यांनी त्वरित नवीन पार्टी डेमोक्रॅटिक कॉंग्रेस स्थापन केली आणि २१ आमदारांचा पाठिंबा मिळवला. याबदल्यात त्यांनी नरेश अग्रवाल यांना ऊर्जा विभागाचा कार्यभार सोपविला.
दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर कल्याणसिंह सरकारने शाळांमध्ये सर्व प्राथमिक वर्गात भारतमाता पूजा सुरू करण्याचा आग्रह धरला. 'येस सर' ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणायला हवे, असा आदेश त्यांनी काढला. Blog on kalyan singh passsing away
२१ फेब्रुवारी 1998 हा दिवस उत्तर प्रदेशसाठी पहिला आणि कल्याणसिंह यांच्या राजकीय कार्यकाळातील तिसरा काळा दिवस ठरला. राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त करून अचानक रात्री दहा वाजता जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. डेमोक्रॅटिक कॉंग्रेसचे जगदंबिका पाल कल्याणसिंह यांच्या मंत्रीमंडळात परिवहन मंत्री होते. परंतु त्यांनी इतर पक्षांशी गुप्तपणे बोलून कल्याणसिंह सरकार पाडण्याचे आपले काम साध्य केले होते. मात्र या निर्णयाच्या विरोधात अटलबिहारी वाजपेयी यांनी आमरण उपोषण सुरू केले. रात्रीच्या वेळीच लोक उच्च न्यायालयात गेले. दुसर्याच दिवशी राज्यपालांच्या आदेशाला कोर्टाने स्थगिती दिली आणि कल्याणसिंह सरकार पुन्हा स्थापन झाले.
कल्याणसिंह यांची भाजपामधून हाकलपट्टी
कल्याणसिंह यांच्या दुसऱ्या कार्यकाळात एक बदल घडला. पहिल्या कार्यकाळात कल्याण सिंह हे माफियांसाठी डोकेदुखी होते, तर दुसऱ्या कार्यकाळात माफियाच त्यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. पण त्यावेळी आणखी एक गोष्ट घडत होती. कल्याणसिंह यांचे कुसुम राय यांच्याशी कौटुंबिक मैत्रीचे संबंध होते. कुसुम राय यांच्याकडेही सरकारी सत्ता होती.
आजमगडच्या कुसुम राय 1997 मध्ये लखनौच्या राजाजीपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आल्या होत्या. परंतु कल्याणसिंह यांच्या वरदहस्तामुळे अनेक मोठे निर्णय त्या बदलत होत्या. यामुळे पक्षाच्या अनेक नेत्यांची त्यांच्यावर नाराजी होती. यामुळे पक्षात अंतर्गत वादही सुरु झाले. मात्र, कल्याणसिंह यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यांनी सर्वांशी उघडपणे बंड पुकारले. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचे संबंध बिघडले. याचा परिणाम म्हणजे कल्याणसिंह यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून केंद्रात मंत्री बनविण्याचा प्रस्ताव आला. मात्र यामुळे अडवाणींशी असलेले त्याचे संबंध बिघडले.
१९९९ मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कल्याणसिंह यांनी स्वत: चा राष्ट्रीय क्रांती दल नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांचा संपूर्ण प्रभाव भाजपाविरोधात वापरलायूपीमध्ये कल्याणसिंह यांचा काळ संपुष्टात आला. तर भाजपाची नावदेखील बुडाली. युपीत भाजपाचे नुकसान झाले पण कल्याणसिंह यांनादेखील काही फायदा झाला नाही. ते पुन्हा भाजपात आले पण तोपर्यंत सर्व काही बदलले होते. २००७ मध्ये भाजपने पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवून निवडणुका लढवल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
२६ ऑगस्ट २०१४ रोजी कल्याण सिंह यांना राजस्थानच्या राज्यपाल पदाची सुत्रे देण्यात आली. तर जानेवारी २०१५ मध्ये, त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. Blog on kalyan singh passsing away
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कल्याण सिंह आणि नरेंद्र मोदी या दोघांचीही कारकीर्द २००० च्या आसपास खूप वेगाने चढत होती. मोदींनी स्वत:चे राजकारण वाचवले. पण कल्याणसिंह आपली राजकीय कारकीर्द वाचवू शकले नाहीत. जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या लखनौच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कल्याणसिंह यांची आठवण काढली होती. तर नोव्हेंबर २०१६ मध्ये मेरठ मेळाव्यात अमित शहा यांनी राज्यातील जनतेला, कल्याण सिंह यांचे सुप्रशासन यूपीमध्ये येईल, असे असे वचन दिले. सध्या कल्याण सिंह यांचा २५ वर्षांचा नातू संदीप सिंह यांनी अतरौलीचे मतदार संघातून निवडणूक जिकंली तर मुलगा राजवीर आधीच भाजप खासदार आहे.
(स्त्रोत - विकिपिडिया)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.