तेजस ठाकरे - Saam TV
ब्लॉग

तेजस ठाकरे होणार नवे युवा सेना प्रमुख?

तेजस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती वृत्तपत्र आणि समाज माध्यमांवर आपण पाहिल्या आणि त्यानंतर तेजस उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील दुसरे सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना वेग आला.

सुमित सावंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे धाकटे पुत्र तेजस उद्धव ठाकरे Tejas Uddhav Thackeray आज पंचवीस वर्षांचे झाले...आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त Birthday सहसा या आधी न पाहिलेल्या गोष्टी यंदा पाहायला मिळाल्या. त्या म्हणजेच तेजस यांना सेना नेत्यांकडून समाज माध्यमांवर, वृत्तपत्रांमधील जाहिरातींमध्ये दिल्या गेलेल्या शुभेच्छा. will Tejas Thackeray take responsibility of yuva sena

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात मोठमोठ्या फलकांवर जाहिरातींमध्ये शुभेच्छांचा होणारा वर्षाव आपण पाहिलाय. तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र हे चित्र दिसत नव्हतं. पण यंदा मात्र तेजस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती वृत्तपत्र आणि समाज माध्यमांवर आपण पाहिल्या आणि त्यानंतर तेजस उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील दुसरे सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना वेग आला.

राजकारणापासून कायम अलिप्त राहणाऱ्या तेजस उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये आणि विशेषतः शिवसैनिकांमध्ये कायम कुतूहल राहिलं आहे. तेजस ठाकरे हे सहसा राजकीय व्यासपीठावर आपण याआधी कधी पाहिले नव्हते. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये काही सभांमध्ये आणि विशेषतः मोठ्या बंधूंच्या म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभेत वरळीत अनेकदा प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यावेळी या विषयी उद्धव ठाकरे यांनी 'तेजस हा जंगलात रमणारा माणूस आहे. तो इकडे माणसांच्या जंगलात रमणार नाही. सभा कशी असते, ते पाहण्यासाठी तो आला आहे,' असं म्हटलं होतं. will Tejas Thackeray take responsibility of yuva sena

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी १७ ऑक्टोबर २०१० रोजी आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवेश करून घेत युवा सेनेची धुरा आदित्य यांच्या हाती देत असताना “तेजसची तोडफोड सेना आहे, त्याची स्टाईल माझ्यासारखी आहे, छंद माझ्याशी जुळते आहेत, वन्यजीवन त्याला आवडतं ,” असं म्हणत तेजसचं कौतुक केलं होतं. त्यामुळे तेजस हे राजकारणात येतील की नाही याविषयी कायम चर्चा होत राहिल्यात आणि आज त्याचीच पुनरावृत्ती होतेय.will Tejas Thackeray take responsibility of yuva sena

तेजस उद्धव ठाकरे हे राजकारणापासून दूर असले तरी त्यांनी त्यांचा एक वेगळा छंद जोपासलाय. तेजस एक वन्यजीव संशोधक आहेत . आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीव संशोधन करणाऱ्या अनेक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. आजवर माश्यांच्या , खेकड्यांच्या आणि काही वन्य जीवांचा त्यांनी नव्याने शोध लावलाय आणि त्या वन्यजीवांना नावंही दिली आहेत . विशेषतः खेकड्यांच्या प्रजातींमध्ये गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशा नावाच्या या प्रजातींचा समावेश आहे. यातील गुबरमॅतोरिएना थॅकरी या प्रजातीला ठाकरे आडनाव दिलं गेलंय.

तेजस यांनी शोधलेल्या खेकड्यांच्या नव्या प्रजातीला 'झुटास्का' नावाच्या वन्यजीवांवर निघणाऱ्या साप्ताहिकानंही नावं दिलं होतं. या व्यतिरिक्त सह्याद्री पर्वतरांगेत त्यांनी केलेल्या वन्यजीवांच्या संशोधनात एका माश्याचा शोधला होता. त्या माश्यालाही 'हिरण्यकेशी' असं नाव देण्यात आलं होतं. आजवर तेजस यांनी १४ वन्य जीवांचा शोध लावून त्यावर शोध निबंध तयार केलेत, यातील काही शोध निबंध आंतरराष्ट्रीय मासिके आणि काही नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे वन्यजीव संशोधन करणाऱ्या तेजस यांनी लहानपणापासून राजकारणाच बाळकडू मिळूनही त्यांनी वेगळा मार्ग चोखाळलाय. will Tejas Thackeray take responsibility of yuva sena

पण इतिसात डोकावून पाहिलं तर सध्या राज्यात यशस्वीपणे महाविकास आघाडीचं नेतृत्व करत मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वी सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः एक फोटोग्राफर होते आणि ते कायम सक्रीय राजकारणापासून दूर राहत होते. त्यांचा राजकारणातला प्रवेश आणि नंतर राजकीय यशस्वी वाटचाल करत मुख्यमंत्री पद सांभाळत महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे आपण पाहतोय. तेजस ठाकरे त्याच कुटुंबातील सदस्य असताना ते राजकारणापासून अलिप्त राहतील असं कसं होईल ?

आदित्य ठाकरे यांनी युवासेनेची जबाबदारी संभाळतानाच त्यांच्याकडे आता मंत्रिपद आहे , महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारीही आदित्यच सांभाळत आहेत. त्यामूळे युवासेनेची जबाबदारी ठाकरे कुटुंबतीलच तिसऱ्या पिढीतील धाकट्या ठाकरेंकडेच सोपवली जाईल अशी चर्चा सुरू आहे. राजकारणापासून कायम अलिप्त राहिलेले तेजस हे बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक आहेत, पण त्यांचा स्वभाव हा आक्रमक असूनही तितकाच संयमी आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात येऊन युवा सेनेची धुरा ते सांभाळतील, अशी शक्यता आता वाढली आहे...त्यातच आजच्या सेनेच्या नेत्यांनी दिलेल्या जाहीर शुभेच्छा त्याचीच नांदी आहे, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT