मस्य पालन व्यावसायात तरुणांची भरारी; माशांची निर्यात थेट आफ्रिकेत Saam Tv
ब्लॉग

मस्य पालन व्यावसायात तरुणांची भरारी; माशांची निर्यात थेट आफ्रिकेत

आज तीन वर्षानंतर निर्यात दराच्या मार्फत चिलापी जातीचे मासे थेट परदेशात निर्यात होत आहे.

गोविंद साळुंके

शिर्डी: तरुणांची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी वणवण फिरतात मात्र राहुरी तालुक्यातील तरुणांनी एकत्र येत मत्स्य पालन व्यवसाय सुरू केला आहे. आज तीन वर्षानंतर निर्यात दराच्या मार्फत चिलापी जातीचे मासे ते परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मुळा धरणातील मासे दक्षिण आफ्रिकेला रवाना झालेत 150 टन मासे विक्रीतून 80 ते 90 रुपये प्रतिकिलो भावानुसार सुमारे साडेबारा लाख रुपये एकूण उत्पादन मिळणार आहे. खर्च वजा जाता निव्वळ नफा 5 लाख रुपये मिळणार आहे.

राहुरी तालुक्यातील मुळा धरणात जलाशयात मत्स्य विभागाच्या सहकार्याने केज फिश फार्मिंग अर्थात पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन केलं जातंय. मुळा धरणामध्ये जवळपास 80 वर पिंजरा मत्स्य पालन करणारे प्रकल्प उभे राहिले आहे. अनेक युवकांनी एकत्र येत या व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. लहान आकाराचे मत्स्यबीज योग्य प्रमाणात संचयन करून त्यांना अनुकूल वातावरण आणि खाद्य पुरवून त्यांना विक्री एवढे वाढवले जाते या मत्स्य संवर्धन व्यवसायात अनेक उच्चशिक्षित तरुण उतरले आहेत. गोड पाण्यातील चिलापी काळ्या आणि गुलाबी माशांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते. समुद्रातील माशाप्रमाणे आता गोड पाण्यातील देशा अंतर्गत विदेशातुन मोठी मागणी वाढत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील माशे थेट दक्षिण आफ्रिकेत जाणार असल्याने 150 टन ऑर्डर मिळाल्यानंतर मत्स्य उत्पादन तरुण आनंदी झाले आहे. परदेशात विक्री करण्याबरोबर लाईव्ह फीशिंग विक्री सुद्धा लवकरच करणार असल्यास मत्स्य उत्पादक गोरक्ष अडसुरे यांनी सांगितले. राज्याच्या आणि केंद्राच्या मत्स्य संवर्धन विभागाकडून पिंजऱ्यातील केज मत्स्य व्यवसायासाठी 60 टक्के सबसिडी दिली जाते. अर्थात हा कर प्रकल्प उभारणीचा एक माध्यम युनिटचा खर्च जवळपास 70 लाखांच्या आसपास आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Ganesh: अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

VIDEO: संभ्रम नाहीच, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, पण.. ; जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT