Twitter वर नथुराम ट्रेंडिंग...काँग्रेससह अनेकांचा आक्षेप Saam Tv
ब्लॉग

Twitter वर नथुराम ट्रेंडिंग...काँग्रेससह अनेकांचा आक्षेप

भारतचे राष्ट्रपती ते पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधींचे स्मरण करत आहेत. पण या दरम्यान काही लोक नथुराम गोडसेच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर ट्रेंड चालवत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. तशीच आजही साजरी केली जात आहे. भारतचे राष्ट्रपती ते पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधींचे स्मरण करत आहेत. पण या दरम्यान काही लोक नथुराम गोडसेच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर ट्रेंड चालवत आहेत. भारतात ट्विटरवर #नाथुरमगोडसेजिंदाबाद ट्रेंड करत आहे, त्यावर काँग्रेस पक्षासह अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

व्हिडीओ-

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त गोडसे, त्यांचे मारेकरी आणि कट्टरपंथी विचारसरणीच्या समर्थनार्थ एक ट्रेंड चालवणे हे काही नवीन नाही. हे दरवर्षी किमान दोनदा असे होत असते. पहिले, गांधीजींच्या स्मृतीदिनी आणि दुसरे त्यांच्या जयंतीनिमित्त. ट्विटरवर आज #गांधीजी जयंती आणि #2 ऑक्टोबर नंतर 50 हजारांहून अधिक ट्वीट्ससह तिसऱ्या क्रमांकाचा ट्रेंड आहे.

त्यावेळेस गांधींजींची विचारसरणी ही भारताच्या भविष्याच्या दृष्टिटोकनातून विचार करणारी होती. आणि हीच विचारसरणीने आजही लोक चालतात. गोडसे हे उजव्या विचारांचे नेते, हिंदू महासभा राजकीय पक्षाचे सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी सदस्य होते. परंतु गोडसे यांची आक्रमक विचारसरणी ही त्यावेळेसच्या परिस्थितीनुरूप वाटत असली तरी, ती मात्र ती देशाच्या पुढील भवितव्यासाठी घातक असल्याचं मत काही तज्ज्ञ व्यक्तींनी व्यक्त केलं आहे.

आजच्या दिवशी देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ @TwitterIndia @Twitter वर चालवण्यात आलेले ट्रेंड ब्लॉक करावेत व ट्रेंड मध्ये सामील झालेल्यांचे अकाऊंट बंद करण्यात यावेत अशी माझी ट्वीटर कडे मागणी आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT