Maharashtra Live News Updates Saam tv
ब्लॉग

Maharashtra News Live Updates : खालापूरमध्ये धनगर समाजाचा रस्ता रोको

Priya More

Maharashtra News : खालापूरमध्ये धनगर समाजाचा रस्ता रोको

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाजाने खालापूर येथे रस्ता रोको आंदोलन केले. खोपोली पाली रस्त्यावर पालिफाटा येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन केले जात आहे मात्र याकडे कोणत्याच सरकारने लक्ष नाही. समाज बांधव गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण करीत आहेत. याकडे देखील सरकारने दुर्लक्ष करीत आहे. सरकारला समाजाची ताकद दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. खालापूर तहसिलदार यांना या वेळी निवेदन देण्यात आले.

मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळुन आला आहे. मुळा नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी सोडण्यात आल्याने , मुळा नदी पात्रातील लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत.

खालापुरमध्ये धनगर समाजाचा रस्ता रोको

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाजाने खालापूर येथे रस्ता रोको आंदोलन केले. खोपोली पाली रस्त्यावर पालिफाटा येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन केले जात आहे मात्र याकडे कोणत्याच सरकारने लक्ष नाही. समाज बांधव गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण करीत आहेत. याकडे देखील सरकारने दुर्लक्ष करीत आहे. सरकारला समाजाची ताकद दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. खालापूर तहसिलदार यांना या वेळी निवेदन देण्यात आले.

Girish Mahajan News: सरपंच व उपसरपंचांचे मानधन वाढले

राज्यातील सरपंच व उपसरपंच मानधन दुप्पट करण्यात आले आहे .

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी एकच पद करण्यात आले आहे

ग्रामपंचायती वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे त्यांना १० लाखपर्यत करण्यात आले

ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी कर्मचारी यांच्या मानधन मध्ये २० टक्के वाढ करण्यात आले

Latur News: निलंगा येथे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, मराठा समाजाकडून निषेध...

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे., दरम्यान त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहेत. आज लातूरच्या निलंगा शहरात सकल मराठा समाजाकडून बंदच आव्हान करत सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली आहे.. यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत, सरकारचा निषेध केला आहे.. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांनी पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता..तर आंदोलकांकडून सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखिल केली आहे...

ITI Name Changed: राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर, मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय

राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय

आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार

ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव

डॉ बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव

कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटेंचे नाव

Pune News: निवडणुकीपूर्वी नियुक्त द्या भावी अधिकाऱ्यांची राज्य लोकसेवा आयोगाला विनंती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनातील राजपत्रित गट अ व गट व पदाकरिता घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडल्या रखडल्याने भावी अधिकाऱ्यांवरती आंदोलनाची वेळ आली आहे.

राज्य शासनातील गट अ व गट व अशा विविध संवर्गातील एकूण ६२३ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा-२०२२ परीक्षेची जाहिरात दि.११ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झाली. सदरची पूर्व परीक्षा दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी होऊन मुख्य परीक्षा दि. २१ ते २३ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. मुलाखत कार्यक्रम सुमारे १ वर्ष उलटल्यानंतर डिसेंबर ते जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडला. तद्नंतर या परीक्षेची गुणवत्ता यादी दि.१८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर होऊन दि. २० मार्च २०२४ रोजी तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आली.

Mumbai News: हातावर काळ्या फिती बांधत परिवहन विभागातील कामगारांचे आंदोलन

महाराष्ट्र कर्मचारी युनियन तर्फे परिवहन विभागातील रोजंदारी व ठोक मानधनावरील कामगारांना कायम करणे, कामगारांची पगार वाढ करणे तसेच कामगारांना आरोग्य सुविधा देणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलेय. परिवहन विभागातील कामगारांनी हातावर काळ्या फिती बांधत नवी मुंबई मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी तुर्भे आगारात जोरदार घोषणाबाजी करत मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

MNS Meeting News: मनसेच्या बैठकीत मुंबई, ठाणे आणि पुणे या विभागांचा घेतला आढावा...

मनसेच्या बैठकीत पहिल्या सत्रात मुंबई, ठाणे आणि पुणे या विभागांच्या आढावा घेतला

मुंबई -36, ठाणे पालघर - २४, पुणे शहर - 11 आणि पुणे ग्रामीण - 8 या मतदार संघाचा घेतला आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातून मनसेचा उमेदवार ठरला ?

आजच्या बैठकीत पाच पाखाडी मतदार संघातून मनसे नेते अभिजीत पानसे यांचे नाव पुढे करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः घेत आहेत प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल.

याच अहवालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्याबाबत अहवाल प्राप्त. मनसे अध्यक्ष घेत आहेत निरिक्षकांकडून अहवाल..

Aditya Thackeray: मुंबई महापालिका उपायुक्त पदी बीएमसी मधील अधिकाऱ्यांमधूनच नियुक्ती करा, आदित्य ठाकरे यांची मागणी

मागील अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधूनच नियुक्त केली जातात, आणि याच अधिकाऱ्यांकडून उपायुक्त पदी राहून लोकांची कामे चांगल्या पद्धतीने हाताळली आहेत.

आता मुंबई महापालिकेतील उपायुक्त पदावर नियुक्तीसाठी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर अन्याय का ? मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी असा सवाल महायुतीच्या सरकारला विचारला आहे

Kalyan News: कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये सापडली 20 लाखांची रोकड, पोलिसांचा तपास सुरू

कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये काल रात्रीच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावर 20 लाख रोकड असलेली बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती .एका प्रवाशाला ही बेवारस बॅग आढळल्याने त्याने याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती देत ही बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली .कल्याण रेल्वे पोलिसांनी बॅग कोणाची आहे याचा तपास सुरू केला आहे

Parbhani News: सोनपेठ शहरात धनगर बांधवांचा रास्ता रोको

परभणीच्या सोनपेठ शहरात देखील धनगर बांधवानी आरक्षणाच्या मागणीसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन केल आहे.आंदोलनात अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त दिसून आला..दुसरीकडे पूर्णा नांदेड महामार्गांवर धनगर समाजा कडून रस्ता रोको करत दीड तास वाहतूक ठप्प केली.

मुंबई महापालिका उपायुक्तपदी बीएमसीमधील अधिकाऱ्यांमधूनच नियुक्ती करा, आदित्य ठाकरे यांची मागणी

मागील अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांमधूनच नियुक्त केली जातात, आणि याच अधिकाऱ्यांकडून उपायुक्त पदी राहून लोकांची कामे चांगल्या पद्धतीने हाताळली आहेत

आता मुंबई महापालिकेतील उपायुक्त पदावर नियुक्तीसाठी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर अन्याय का ? मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी असा सवाल महायुतीच्या सरकारला विचारला आहे

जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलेय. आणि दगडफेक करणाऱ्यांवर कठोर करावी आणि याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेने केलीये. दरम्यान, अकोला पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांची ओळखपरेड सुरू असून सद्यस्थितीत 60 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आलीय. अकोट शहरातील नंदीपेठभागात गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी ही मोठी दगडफेक झाली होतीय. दगडफेकीनंतर काही काळ मिरवणुकीत मोठा गोंधळ उडाला होता. एका प्रार्थनास्थळातून ही दगडफेक झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरातल्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता.. मात्र आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाताला काळा फित बांधून या घटनेचा निषेध नोंदवला.

Beed News : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत मोर्चाकरी शेतकऱ्यांसह नेत्यांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या

Marathi Breaking News : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत शेतकऱ्यांनी भव्य हक्क मोर्चा काढलाय. या मोर्चात बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले आहेत. तर यावेळी परळी शहरात मोर्चा काढल्यानंतर, हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला असून या ठिकाणी शेतकऱ्यांसह नेत्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलन केले आहे..

एसटी (ST) प्रवर्गात अंमलबजावणी करा, या मागण्यासाठी धनगर समाज आक्रमक, महामार्ग 4 तासापसून रोखला

मागच्या 15 दिवसापासून लातूरच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौकात धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत हजारे, तसेच अनिल गोयकर या दोन धनगर आंदोलकांचं आमरण उपोषण सुरू आहे... त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज लातूर-अंबाजोगाई महामार्गावर. सकल धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे... शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज आक्रमक झाला आहे..तर गेल्या 4 तासापासून आंदोलकांनी महामार्ग रोखून धरलेला आहे... तात्काळ धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा.. अन्यथा सरकारला त्यांची जागा दाखवली असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला आहे.

बुलढाण्यात निघाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर" जन आक्रोश मोर्चा"

बुलढाण्यात निघाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर" जन आक्रोश मोर्चा."

थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा.

मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे , खा.अरविंद सावंत सह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी सामील.

शेतकऱ्यांच्या बैलगाडी सह मोर्चाला सुरुवात.

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर शहरात सकल हिंदू बांधवांचा मोर्चा

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर शहरांमध्ये आज सकल हिंदू बांधवांतर्फे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भव्य हिंदू गर्जना भगवा समर्थन मोरचा निघालाय. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले आहे. हातात भगवे ध्वज घेऊन जय श्रीराम चे नारे देत रामगिरी महाराजांचे समर्थक,भक्त आणि सकल हिंदू बांधव गंगापूर शहरात एकवटले असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

लक्ष्मण हाके १७ पक्षांचे उंबरठे झिजवून आलेत, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांची टीका

लक्ष्मण हाके या माणसाने सर्वसमावेशक नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर आरोप करण्याआधी स्वतःची लायकी व पात्रता तपासून पाहिली पाहिजे. त्यांनी सतरा नेत्यांचे आणि पक्षांचे उंबरठे झिजवून आलेले आहेत. लक्ष्मण हाके हा सुपारीबाज माणूस आहे. दोन समाजात भांडणे लावण्यासाठी त्यांना भाडोत्री घेतले आहे अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी केली आहे. काल हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात टीका केल्यानंतर या टीकेला आता प्रत्युत्तर दिलं आहे..

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील संपर्क कार्यालयासमोर मराठा समाजाचे बोंबमारो आंदोलन

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव येथील संपर्क कार्यालयासमोर मराठा समाजाचे बोंबमारो आंदोलन

मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्याबाबत पञ देण्याची मराठा आंदोलकांची मागणी

मराठा आरक्षणाबाबत भुमीका जाहीर करण्याची मागणी मराठा आंदोलकांची मागणी

कार्यालयासमोर पोलीसांचा बंदोबस्त तैनात - मराठा आंदोलकांच्या एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी

पिंपरी चिंचवड शहरात आज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आंदोलन

पिंपरी चिंचवड शहरात आज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आला आहे. मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या ऊपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरात सकल मराठा समाज बांधवा तर्फे आंदोलन करण्यात आला आहे. पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सकल मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केला आहे.

Pune News : सिटी पोस्टाच्या जागेत पडलेल्या खड्ड्याच नेमक रहस्य काय ?

पुण्यातील सिटी पोस्ट मध्ये जमीन खचून जेटिंग व्हॅन खड्ड्यात गेल्या प्रकरणातला चाळीस तास उलटून गेलेत पण हा खड्डा नेमका कशाने पडला ते अजूनही स्पष्ट होऊ शकलेल नाही.

त्यातच सिटीपोस्टाच्या खाली भूगर्भातून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रोचा भूमिगत मार्ग गेलाय ज्याच उदघाटन दोन दिवसांनी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी घडलेल्या या घटनेने मेट्रो लाईनला काही धोका आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय. जमीन खचून ‘जेटिंग व्हॅन’ खड्ड्यात गेलेल्या ब्रिटिशकालीन मध्यवर्ती सिटी पोस्ट आवारातील जागेची जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केलीय. या खड्ड्याची पाहणी करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह मेट्रोचे अधिकारी तसंच आरकेलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहणी केलीय. या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. पण हा खड्डा नेमका कशाने पडला यांच अधिकृत उत्तर अजून ही समोर येत नाहीय.

मी तुमच्या साक्षीने सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांना संधी एक-दोन दिवसात आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करायची. मराठा -ओबीसी वाद नाही. आम्ही उत्तर देत नाही म्हणून मस्ती चालली.
मनोज जरांगे पाटील

Marathi Headlines : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत शेतकऱ्यांचा हक्क मोर्चा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 23 September: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी शहरांमध्ये शेतकऱ्यांनी भव्य हक्क मोर्चा काढलाय. या हक्क मोर्चा शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले आहेत. थोड्याच वेळात हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.पिक विमा आणि सातबारा कोरा करा, शेतकरी कर्जमुक्त करा, रखडलेला पिक विमा तात्काळ द्या, शेतकऱ्याच्या सोयाबीन 7 हजार आणि कापसाला 10 हजार भाव द्या..या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा निघाला आहे..दरम्यान या मोर्चात परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते, शेतकरी सहभागी झाले होते

Maharashtra News Live Updates : धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्यासाठी रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन

धनगर समाजाचा ST प्रवर्गा मध्ये समावेश करावा या मागणीसाठी आज वाशिमच्या रिसोड शहरातील लोणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनामुळे वाशिम - लोणार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 20 मिनिटे चाललेल्या या रास्ता रोको आंदोलना नंतर धनगर बांधवांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निरीक्षकांच्या बैठकीत मुंबईचा आढावा घेतला....

मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकीतील मनसेला पडलेली मत आणि लोकसभेला जर मनसे उभी असती तर किती मत पडली असती? या संदर्भात घेतला आढावा...

येणाऱ्या विधानसभेला मनसे संबंधित विधानसभा लढवली तर किती मत पडू शकतील? याचीही आकडेवारी राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या विभाग अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना विचारली.

राष्ट्रवादी वेगळी लढणार या वावडया आहेत.आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा लढू. महायुतीने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे महायुतीबाबत जनतेत अनुकूल वातावरण आहे. या निर्णयांमुळे अनेक विरोधकांचे नेते सत्तेत येणार नसल्यामुळे अशी वक्तव्य विरोधक करत आहेत. जी वक्तव्य होतं आहेत. त्याबाबत प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे
सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट
मनोज जरांगे एक वर्षात सहाव्यंदा उपोषणाला बसले आहेत.ही महाराष्ट्रातील शरमेची बाब आहे. आंदोलनाबाबत निर्णय आजही सरकारने घेतला नाही. मला मनोज जरांगे यांची तब्येत खलावली कळालं म्हणून मी त्यांच्या तब्येत विचारपूस करण्यासाठी आलोय. छत्रपती घराण्याचा व्यक्ती म्हणून त्यांची तब्येत पाहण्यासाठी आलो.
संभाजीराजे छत्रपती

आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला

आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला

मुख्यमंत्री आतिशी यांच्या कार्यालयात दोन खुर्च्या

अरविंद केजरीवाल यांची खुर्ची बाजूला ठेवून आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला

"ज्या प्रकारे भरतज यांनी भगवान श्रीरामांचे खडाऊ (चपला) ठेवून काम केले, त्याच प्रकारे मी पुढील 4 महिने मुख्यमंत्रीपद सांभाळेन- आतिशी

मराठा आरक्षण संदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकिनंतर उपसमितीची आज महत्वाची बैठक.

मराठा आरक्षण संदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकिनंतर उपसमितीची आज महत्वाची बैठक.

सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी २ वाजता होणार बैठक.

बैठकिला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाईसह कायदेतज्ञ राहणार उपस्थित.

हैद्राबाद गॅजेटची प्रत सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रीया कशी राबवावी यावर चर्चा होण्याची शक्यता...

पंढरपुरात धनगर समाजाचे रास्तारोको आंदोलन

धनगर समाज आरक्षण मागणीसाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पंढरपुरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजाने आज राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पंढरपूर - कराड मार्गावर धनगर बांधवानी शेळ्या मेंढ्या घेऊन रास्तारोको आंदोलन‌ केले. सरकारने धनगड दाखले रद्द करून तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी हे रास्तारोको करण्यात आले.

शरद पवार यांनी मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यावे असे बोलले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही . शरद पवार यांचा पर्याय कूचकामाचा आहे.
संजय शिरसाट
भरत गोगावले यांनी वेगळं बोलले, ते तुमच्या समजण्यात वेगळं आले. मी असं म्हणालो होतो की पहिला शपथविधी झाल्यानंतर मी राजीनामा देईल. मग मला शिंदे साहेबांनी समजावल्यानंतर मी तो निर्णय मागे घेतला.
संजय शिरसाट

समृध्दी महामार्गावर MIM च्या कार्यकर्त्यांकडून कायद्यांची पायमल्ली

- समृध्दी महामार्गावर MIM च्या कार्यकर्त्यांकडून कायद्यांची पायमल्ली

- रॉंग साईड (विरुद्ध दिशेने ) वाहने चालवणे,वाहनाच्या टपावर बसून गाड्या पळवत नियमांची पायमल्ली करणे

- स्वतः सह महामार्गावरील इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई नाही

- समृध्दी महामार्गावरील भरारी पथकाकडूनही दुर्लक्ष

maratha aarakshan : सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक..

सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक..

नगर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद तर नवनागापूर येथे कडकडीत बंद..

मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक..

माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाजवळ मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याल अभिवादन करून

व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना केले बंदचे आवाहन..

बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात..

 Beed : धनगर समाज आरक्षण प्रश्नावर लातूर - बीड महामार्ग आडवला

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी बीड - लातूर महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरल्याने जवळपास एक तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाला सरकार वारंवार केवळ आश्वासन देत असून एसटीमध्ये समावेशाच्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने या ठिकाणचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. उपस्थित पोलीस अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारने यावर गांभीर्याने विचार न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी 5 वाजता अमित शहा कोल्हापुरात दाखल होणार आहेत. साडेपाच वाजता अमित शहा करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. सहा ते साडेसातच्या दरम्यान अमित शहा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.

Mumbai News: मनसे नेते अमित ठाकरेंसोबत मनसेच्या निरीक्षकांच्या बैठकीला सुरुवात

मनसे नेते अमित ठाकरेंच्या सोबत मनसेच्या निरीक्षकांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला मनसेचे १०० निरीक्षक हजर राहिले आहेत. निरीक्षकांनी जिल्हानिहाय घेतलेल्या आढव्यावावर मंथन होणार. विधानसभेला 225 जागा लढणार असल्याची राज ठाकरे यांनी घोषणा केली होती.

Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांच्या मुलाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर आले असताना विक्रांत जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Mumbai News: धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या समितीची आज बैठक 

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज तिसरी बैठक होणार आहे. ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव विनिता सिंगल मॅडम यांच्या दालनामध्ये दुपारी १२ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेली असताना देखील जरांगे उपोषण मागे घेत नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decision : कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 24 मुद्दे

Pune News : मुळा नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा परिणाम

Jayant Patil : जयंत पाटलांची महायुतीवर टीका, VIDEO

Richa Chadha : रिचाच्या घरी येणार एक नवा पाहुना

Skincare Tips: पिंपल्समुळे त्रस्त आहात? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT