Jayant Patil : जयंत पाटलांची महायुतीवर टीका, VIDEO

Mahayuti Sarkar : सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारच्या तिजोरीत पैसे नाही असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या दिसतील असं म्हणत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता सरकारच्या तिजोरीत पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर आता राज्यात पुढच्या चार महिन्यात कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होताना दिसतील. असा आरोप करत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा धुळ्यात आली आहे. त्यानिमित्त धुळ्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारने योजनांचे पैसे देखील फस्त केले असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com