Kargil Vijay Divas : सलाम कारगिल योद्ध्यांना ... Saam tv News
ब्लॉग

Kargil Vijay Divas : सलाम कारगिल योद्ध्यांना ...

कारगिल युद्धामध्ये आपले 500 हून अधिक शूर योद्धे हुतात्मा झाले तर 1300 हून अधिक जखमी झाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण पाकिस्तानला (Pakistan) भारतापासून (India) विभक्त होण्याच्या मोबदल्यात भारताला हे स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तान भारतापासून विभक्त झाला पण काश्मीरच्या (Kashmir) मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले ते कायमचे. भारताचा मुकूट समजला जाणारा कश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्ताने भारतावर अनेक हल्ले केले,पण भारताने प्रत्येकवेळी पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर दिले. १९९९ चे कारगिल युद्ध हे त्याचेच एक उदाहरण आहे. (Kargil Vijay Diwas: Salute to the Kargil warriors ...)

२६ जुलै १९९९ देशात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. याचे कारण म्हणजे, कारगिल युद्धात प्राणांचे बलिदान देणाऱ्या शुर सैनिकांना हा दिवस समर्पित आहे. कारगिल युद्धामध्ये आपले 500 हून अधिक शूर योद्धे हुतात्मा झाले तर 1300 हून अधिक जखमी झाले. त्यापैकी बहुतेक तरूण होते ज्यांनी आपल्या वयाची 30 वर्षेदेखील पाहिली नव्हती. या सैन्याने प्रत्येक सैनिका तिरंग्यासमोर घेतलेल्या भारतीय सैन्याच्या शौर्य आणि बलिदानाची सर्वोच्च परंपरा चालविली. कारगिल युद्धात शहिद झालेल्या काही शुरांची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सैन्यदलातील एक अधिकारी होते. कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय स्थल सेनेतील १३ व्या बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते. कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान ६ जुलै १९९९ रोजी त्यांना हुतात्मा झाले. युद्धातील त्यांच्या शौर्य आणि पराक्रमासाठी त्याना भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

कॅप्टन सौरभ कालिया

कॅप्टन सौरभ कालिया

कॅप्टन सौरभ कालिया, कारगिल युद्धाचा पहिले हुतात्मा म्हणून ओळखले जातात. कोणाच्या बलिदानाने कारगिल युद्धाची प्रस्तावना लिहीली जाते. वयाच्या केवळ 22 व्या वर्षी शत्रू त्यांना 22 दिवस अफाट वेदना देत राहिला. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडल्याने त्यांनी सौरभ यांचा अमानुष छळ केला.

सौरभबरोबरच्या अमानुषपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. कॅप्टन कालिया यांचा मृतदेह जेव्हा त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ना डोळे होते, ना कान. त्यांचे कुटुंबीय देखील त्यांचा मृतदेह ओळखू शकले नाहीत. त्यांच्या फक्त भुवया उरल्या होत्या.

कॅप्टन मनोज कुमार पांडे

कॅप्टन मनोज कुमार पांडे

कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनादेखील कारगिल युद्धामधील अद्वितीय शौर्यासाठी मरणोत्तर भारताचा सर्वोच्च वीरता परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. पाकिस्तान सोबत झालेल्या

कारगिल युद्धात खल्लूबर हा एक कठीण प्वाइंट भारतीय सैन्याला काबीज कारायाचा होता. हा प्वाइंट जिंकण्यासाठी मनोज कुमार यांनी आपल्या गोरखा रायफल्सचे नेतृत्व केले आणि शत्रूशी लढा दिला आणि खल्लूबर प्वाइंट भारतीय सैन्याच्या स्वाधीन करत देशासाठी शहीद झाले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी आपल्या शौर्याचे आणि देशासाठी धैर्याचे उदाहरण दिले.

लान्सनायक रणबीर सिंग

लान्सनायक रणबीर सिंग

30 मे 1999 रोजी 17 जाट बी कंपनीचे लान्सनायक रणवीर सिंग द्रास सेक्टरमधील मशकोह व्हॅलीच्या रॉकी नॉब मिशनमध्ये सामील झाले. ते सुभेदार हरफूल सिंग यांचे रेडिओ ऑपरेटर होते. शत्रूच्या बंकरच्या दिशेने जाताना त्याने त्याच्या प्लाटून कमांडरला मध्यम मशीनगनने गोळ्या घालताना पाहिले. आपल्या वैयक्तिक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, रणवीर सिंगने प्लाटून कमांडरला कंपनी कमांडरशी संवाद साधण्यास मदत केली. त्याच वेळी शत्रूच्या बंकरला त्यांच्या वैयक्तिक शस्त्रास्त्राने विचलितही केले. हे करत असताना एका शत्रूच्या स्नाइपरने त्यांना गोळ्या घातल्या. सिपाही रणवीर सिंग यांनी सैन्याने आपल्याला दिलेले कार्य पुर्ण केले. मात्र या युद्धात त्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले.

विनोद कुमार नागा

विनोद कुमार नागा

१ नोव्हेंबर १९७६ रोजी जन्मलेले विनोद कुमार नागा 6 ऑक्टोबर 1994 रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले. भारत-पाकिस्तान कारगिल युद्धादरम्यान 30 मे 1999 रोजी त्यांना वीरमरण आले. भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर पाच वर्षानी विनोद शहीद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT