Plight of Hingoli Fishermen due to Corona
Plight of Hingoli Fishermen due to Corona 
ब्लॉग

कधी कोरोना तर कधी निसर्गाची अवकृपा; हिंगोलीच्या मच्छिमारांची होतेय दैना!

संदीप नांगरे

कोरोना महामारीच्या संकटाने अवघे विश्व जेरीस आले आहे, दररोज लोकांचे जीव जात आहेत अनेकांना या रोगाचा सामना करताना नरक यातना देखील भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र आहे. प्रत्येकाच्या हातचे काम गेल्याने अनेक जण नैराश्याच्या गर्तेत आले आहेत, मात्र हिंगोलीत Hingoli असा एक समाज घटक आहे , ज्याच्या हाताला काम आहे , व्यवसायाला कष्टाची जोड आहे मात्र तरी ही तो आर्थिक नैराश्यात जीवन जगत आहे कोण आहे हा समाज? Higoli Fishermen facing Troubles for last Five Years

तर हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील मत्स्य बांधव Fishermen. हिंगोली जिल्ह्यातील सिध्देश्वर, येलदरी Yeldari आणि इसापूर या प्रमुख धरणात Dam गेल्या पस्तीस वर्षां पासून हे मच्छीमार मासेमारी करतात.  संपूर्ण कुटुंब या व्यवसायात असल्याने कुणी होडी तयार करतं,कुणी धरणात सोडतो तर कुणी मासेमारी करून बाजारात विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो.  अशी ही हिंगोली जिल्ह्यातील बाराशे पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंब. निसर्गाच्या Nature आस्मानी सुलतानी संकटाशी दोन हात पुढे करत नेहमी यशस्वी झाली आहेत. मात्र गेल्या पाच वर्षा पासून कोसळणाऱ्या संकटांनी या मच्छीमारांचे सर्व काही हिरावून घेतले जात आहे,.

२०१६ साली हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ Famine पडला, जिल्ह्यातील धरणे , लहान मोठे तलाव आटलेपोटाच्या लेकराप्रमाने जोपासलेली मत्स्य बीज जागीच करपून गेली. पुढे तीन वर्ष हा दुष्काळ असाच चालू राहिल्याने एकजूट असलेली कुटुंबे कामाच्या शोधात विविध जिल्ह्यात गेली, मात्र २०२० मध्ये मृग नक्षत्राच्या सुरुवातीला निसर्गाने मच्छीमारांनवर कृपा करत बरसायला सुरुवात केली अन् कधी नव्हे ते हिंगोलीचे तिन्ही धरणे ओव्हरफ्लो झाली.  मोठ्या आशेने मच्छीमार पुन्हा गावाकडे परतले.  पुन्हा नव्याने सर्व होड्या आणि मत्स्य मारीचे साहित्य जमा केले.

मात्र मार्च २०२० मध्ये , कोरोना Corona नावाचा विषाणू आला अन् पुढे असलेला घास हिरावून घेतला गेला. करोडोंच्या संख्येने मोठमोठे मासे तयार झाले... पण.....कधी संचारबंदी कधी लॉकडाऊन Lock Down तर कधी जनता कर्फ्यु मच्छीमारांच्या मुळावर उठला. तयार झालेला माल बाजारात विक्री Sale करता येत नसल्याने आता हे मासे ठेवायचे कुठे आणि संपूर्ण कुटुंबाची भिस्त असलेला हा व्यवसाय करायचा कसा असा मोठा प्रश्न या मत्स्य विक्री करणाऱ्या बांधवांच्या समोर आsssवासून उभा ठाकला आहे.Higoli Fishermen facing Troubles for last Five Years

सरकारने पंधरा तारखे पासून एप्रिल April महिना पूर्ण संचारबंदी Curfew लागू करताना समाजातील अनेक घटकांचा विचार करून त्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र यात मत्स्य विक्री करणाऱ्या या लोकांचा कुठेही उल्लेख नसल्याने,  मुख्यमंत्री साहेब तुमची सांगा आम्ही जगायचे कसे असा उद्वीग्न सवाल मत्स्य विक्री करणारी शेकडो कुटुंब विचारत आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रात धडाका

Sharad Pawar Speech : इथून पुढे मातीची कुस्ती कमी होईल, मॅटवरचा सराव हवा; शरद पवारांचा राज्यातील कुस्तीपटुंना सल्ला

Dinner: रात्री जेवण केले नाही तर काय होईल?

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT