Beed News
Beed News विनोद जिरे
ब्लॉग

स्मशानभूमी नसल्यानं रस्त्यावरच अंत्यविधी; बीडच्या चौथेवाडी गावातील धक्कादायक घटना

विनोद जिरे

बीड - देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे झालेत, मात्र या 75 वर्षात एकीकडे नागरिक चंद्रावर जात असणारा, दुसरीकडे मात्र आजही गावखेड्यात पायाभूत सुविधा पोहचल्या नाहीत. यामुळं बीडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने खुद्द गावच्या माजी सरपंचलाचं आपल्या आईचा अंत्यविधी रस्त्यावर करावा लागला आहे. विशेष म्हणजे हे गाव राज्याच्या राजकारण ठसा असणाऱ्या मुंडे बहीण भावाच्या मतदार संघात येतं.

या गावची लोकसंख्या जवळपास अकराशे ते दीड हजारच्या घरात आहे. या गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. मात्र गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशानभूमीचं नाही. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे ज्या ग्रामस्थांकडे शेती आहे.ग्रामस्थ आपल्या कुटुंबातील व्यक्ती एखादी मयत झाली, तर अंत्यविधी शेतात करतात. मात्र या गावात काही मागास प्रवर्गातील कुटुंब आहेत, त्यांना शेती नसल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा अंत्यविधी भररस्त्यात करावा लागतो आणि ही परिस्थिती दोन पिढ्यांपासून सुरू आहे. आजपर्यंत या ग्रामस्थांनी अनेकवेळा तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, यांना एक ना अनेक वेळा निवेदन दिली, मागणी केली. मात्र अध्याप स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला नाही.

तर गेल्या दोन दिवसांपूर्वी गावचे माजी सरपंच लक्ष्मण मिसाळ यांच्या मातोश्री धोंडाबाई रानबा मिसाळ वय 90, यांचे निधन झाले. मात्र गावात स्मशानभूमीत नसल्याने, त्यांचा अंत्यविधी चौथेवाडी- घाटनांदूर या भररस्त्यात करावा लागला. आम्ही अनेकवेळा निवेदने दिलीत तक्रारी केल्या मात्र आमचा प्रश्न मार्गी लागला नाही स्मशानभूमीची मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देखील आहे. मात्र त्यांनी देखील हा प्रश्न मार्गी लावला नाही त्यामुळे आम्हाला तात्काळ स्मशानभूमी मिळावी अन्यथा यानंतर जर गावात एखादा व्यक्ती मयत झाली तर त्यांचा अंत्यविधी अंबाजोगाईच्या तहसीलदाराच्या कार्यालयात करू असा इशारा माजी सरपंच लक्ष्मण मिसाळ यांनी दिला आहे.

तर याविषयी गावातील वृद्ध ग्रामस्थ भानुदास कांबळे म्हणाले, की मी जन्मलो तसं आमच्या गावात स्मशानभूमी नाही. कोणीही गावात मयत झालं तर त्याच्यावर रस्त्यावर अंत्यविधी करतात. अनेक वेळा आम्ही आमदारांकडे गेलो, नामदाराकडे गेलो, तहसिलदाराकडे गेलो, मात्र आजपर्यंत आम्हाला स्मशानभूमी मिळाली नाही. एक वेळा तर आमच्या कुटुंबातील महिला मयत झाली, त्यावेळी दोन दिवस रस्त्यावर बॉडी ठेवली, मात्र याची दखल कोणी घेतली नाही. विशेष म्हणजे गावात एखादा मुस्लीम समाजातील व्यक्ती मयत झाला, तर त्याला गावापासून पाच किलोमीटर लांब असणाऱ्या घाटनांदुर येथे अंत्यविधीसाठी घेऊन जावं लागतंय. उन्हाळ्यात पण अडचण आणि पावसाळ्यात पण अडचण आमच्यासमोर आहे. त्यामुळे सरकार आणि आमदार, मंत्र्यांनी आम्हाला स्मशानभूमी द्यावी. एवढीच आमची मागणी आहे. जर आमची मागणी पूर्ण केली नाही, तर आता यानंतर आम्ही तहसीलदाराच्या कार्यालयात अंत्यविधी करणार आहोत. असा इशारा गावातील वृद्ध भानुदास उमाजी कांबळे यांनी दिला आहे.

तर याविषयी ग्रामस्थ शिवाजी सोनवणे म्हणाले, की आमच्या गावात मी जन्मल्यापासून स्मशानभुमी नाही. जर कोणी मयत झालं तर रस्त्यावर अंत्यविधी करावा लागतोय. मागासवर्गीय व्यक्तींना शेती नाही, त्यामुळे मोठी अडचण आहे. विशेष म्हणजे आमचं गाव हे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघांमध्ये आहे. मात्र ते सामाजिक न्याय मंत्री असताना देखील ते आमच्या गावाला न्याय देऊ शकत नाहीत. ही आम्हाला खंत वाटते. आम्ही अनेक वेळा निवेदन दिले, आंदोलन केलं, अंत्यविधी अडवले. मात्र केवळ घोषणा केल्या, आश्वासन दिली त्यापलीकडे त्यांनी काहीच केलं नाही. ते म्हणतात आम्ही पैसे देतो, तुम्ही जागा बघा, पण आमच्या गरिबांना कोण जागा देत नाही. आमची एकच मागणी आहे आम्हाला तात्काळ स्मशानभूमी द्यावी. अन्यथा आम्ही गावात कोण मयत झाला तर तहसीलच्या दारातच अंत्यविधी करणार आहोत. असा इशारा शिवाजी बाबुराव सोनवणे या ग्रामस्थानी दिला आहे

विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात ज्या मुंडे बहिण-भावाचा ठसा आहे, त्या मुंडे बहीण-भावाच्या परळी मतदार संघामध्ये हे गाव येतंय. जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकण्या सिरसाट यांच्या सर्कलमध्ये हे गाव येतंय. मात्र एकानेही ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सोडवली नाही. त्यामुळे आता तरी या गावकऱ्यांना स्मशानभूमी मिळणार का ? आणि मरणानंतर तरी मृतदेहाची होणारी हेळसांड थांबणार का ? हेचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साम टीव्ही बीड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

SCROLL FOR NEXT