Gautami Patil saam tv
ब्लॉग

Gautami Patil Journey : एका चुकीनं आयुष्यच बदललं; गौतमी पाटीलचा दहीहंडी डान्स ते सेलिब्रिटीपर्यंतचा प्रवास

Gautami Patil Viral Dance : गौतमीचा तो विभत्स 'डान्स' प्रचंड व्हायरल झाला होता.

प्रविण वाकचौरे

Gautami Patil News :

गौतमी पाटील हिची आज वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. गौतमी पाटील हे नाव अख्ख्या महाराष्ट्राच्या ओळखीचं बनलं आहे. मात्र आजपासून वर्षभरापूर्वी गौतमी पाटील कोणत्या गर्दीत हे होती हे कुणाला माहितीही नसेल. मात्र गर्दीला बाजूला सारून आज गौतमी पाटील गर्दीतला ओळखीचा चेहरा बनली आहे. गौतमीचा हा प्रवास मागच्या वर्षी दहीहंडीपासून सुरु झाला. मागील वर्षी स्टेजवर नाचणारी ही तरुणी कुणाला माहितही नसेल. मात्र आज याच गौतमीने सेलिब्रिटींच्या मुंबईतलं मार्केट जाम केलं.

गौतमी पाटीलचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. तिचं करिअर सुरु होण्याआधी संपतं की काय अशी परिस्थिती होती. गौतमीलाही कदाचित तेच वाटत असेल. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असेल. कारण गौतमीने दहीहंडीसारख्या सार्वजनिक कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स दुर्लक्ष करावा असा नव्हता. त्यासाठी तिला जाहीर माफी मागावी लागली होती.

घडलं असं होतं की, मागील वर्षी पुण्यातील लोणी काळभोर येथील  दहीहंडीच्या कार्यक्रमात गौतमीने एक डान्स केला होता. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवसापासून हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आजही गौतमीचे डान्स व्हायरल होतात, मात्र तेव्हा ती लोकांसाठी अनोळखी होती तरी तो डान्स व्हायरल झाला होता. सोशल मीडियाचं कोणतं माध्यम बोलू नका तिथे ही काही मिनिटांची क्लिप व्हायरल झाली होती.

अश्लील डान्स व्हायरल

सफेद साडीमधील गौतमीचा 'राती अर्ध्या राती, असं सोडून जायाचं न्हाय...','चंद्राचं गोंदण, रूपाचं कोंदण...' या गाण्यांवरील डान्स लोकांच्या मोबाईलमध्ये अचानक दिसू लागला होता. यात डान्स कमी आणि अश्लील हावभाव जास्त दिसत होते. गर्दीच्या दिशेने नको ते इशारे करणे, अंगावर पाणी ओतून घेणे, अशा पद्धतीचा गौतमीचा तो विभत्स 'डान्स' प्रचंड व्हायरल झाला होता. व्हिडीओ वादग्रस्त असला तरी प्रचंड व्हायरल झाला. अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात होता. (Latest Marathi News)

गौतमीचा माफीनामा

व्हिडीओ लोकांपर्यंत आला त्यावेळी ही बया कोण? हेच लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळी प्रसिद्ध लावणी डान्सर मेघा घाडगे यांनी गौतमी पाटलची चांगली कानउघडणी केली. त्यावेळी मनसेच्या पदाधिकारी असलेल्या रुपाली पाटील यांनीही गौतमीला फटकारलं होतं. याबाबत गौतमीने महाराष्ट्राच्या जनेतेची जाहीर माफीही मागितली आणि वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गौतमीने अनेकदा माफी मागून आपली चूक कबूल केली.

बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ

मात्र 'क्या हुआ जो बदनाम हुए नाम तो हुआ', या प्रमाणे गौतमीची एक चूक तिच्या पथ्यावर पडली. गौतमी पाटील घराघरात पोहाचली. गौतमीची एवढी प्रसिद्ध झाली की चांदा ते बांदापर्यंत तिचे कार्यक्रम होऊ लागले. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी होऊ लागली. आज गौतमीची लोकप्रियता पाहता तिचा कार्यक्रम पोलीस आणि बाऊन्सरच्या सुरक्षेशिवाय होणं अशक्य आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वीची एक चूक गौतमीच्या पथ्यावर पडली. आज गौतमी पाटील डान्स कलाकार म्हणून महाराष्ट्रात प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव जानकर घेणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या

Hrithik Roshan: हृतिक रोशनसोबत काकाच्या लग्नात थिरकले रेहान-रिदान; चाहते म्हणाले, 'बापाप्रमाणेच दोन्ही मुलं...'

SCROLL FOR NEXT