Crime Unplugged | Marathi Crime Podcast :अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा. पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास. मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते. आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक रॉबरीच्या गुन्ह्यांबाबत. अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता. त्याचीच ही कहाणी.
२६ नोव्हेंबर, २०१५, एका खासगी बँकेची कॅश व्हॅन मनी चेस्टमधून २२ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन नवी दिल्लीच्या विकास पुरी शाखेतून निघाली. बँकेच्या एटीएमपर्यंत रोख रक्कम घेऊन जाऊन ती एटीएममध्ये भरणं हे या व्हॅनच्या ड्रायव्हरचे आणि गार्डचे काम. एकूण नऊ स्टीलच्या पेट्यांमध्ये ही रक्कम भरलेली होती. विनय पटेल हे या गार्डचं तर प्रदीप कुमार शुक्ला हे ड्रायव्हरचं नाव. ओखला मंडीपाशी कॅश व्हॅन पोचली तेव्हा वाटेत पटेलने प्रदीप कुमारला गाडी थांबवायला सांगतलं. (अरे रुको जरा, मै पेशाब करके आता हूँ) असं सांगत लघवी करण्यासाठी तो उतरला. नेमकी ही संधी साधून व्हॅनचा ड्रायव्हर प्रदीप शुक्लानं सरळ रोख रकमेच्या पेट्या असलेल्या व्हॅनसह पळ काढला. (Saam TV Podcast)
लघूशंका आटोपून करुन मागं वळलेल्या पटेलला व्हॅन दिसली नाही. त्यामुळे तो चक्रावला. त्याने प्रदीप कुमारला फोन लावला. (अरे भैय्या गये किधर तूम.....) (रुको ट्रॅफिक जागा है मै यु टर्न करके गाडी घुमाके लाता हूँ) प्रदीप कुमारनं पटेलला सांगितलं. पण तो परत आलाच नाही. हबकलेल्या पटेलनं आपल्या एजन्सीला फोन लावला. साब प्रदीप कुमार कॅश व्हॅन लेके गायब हो गया है. अब क्या करु मैं.
एजन्सीतून पोलिसांना फोन गेला. पोलिसही हबकले. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचसह पाच पथकांनी या व्हॅनचा शोध घ्यायला सुरुवात केली. ही व्हॅन शोधण्यासाठी पोलिसांनी जीपीएस ट्रॅकरची मदत घेतली होती. ज्या ठिकाणी गार्ड लघूशंकेसाठी उतरला होता, त्या जागेपासून जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपावर ही व्हॅन उभी असलेली सापडली. (Latest Breaking News)
(अरे वो देखो वो पेट्रोल पंप पे खडी है कॅश व्हॅन) पोलीस व्हॅनजवळ पोहोचले खरे पण त्यात रोख रकमेच्या पेट्या नव्हत्या. नंतर अवघ्या बारा तासातच हा गुन्हा करणारा प्रदीप कुमार पकडला गेला. गोविंदपुरी मेट्रो स्टेशनजवळच्या एका गोदामात त्यानं ठेवलेल्या पैशांच्या बॉक्स सापडल्या. १० हजार ५०० रुपये वगळून अन्य सर्व रक्कम शाबूत होती. त्यानं या पैशातले काही पैसे कपडे आणि घड्याळ खरेदीसाठी वापरलेले होते. थोडक्यात तेवढ्यावरच भागलेलं होतं.
एका रात्री पुरता करोडपती बनलेल्या प्रदीप कुमार शुक्लाचे औदार्य बँकेच्या पैशांवर जागृत झालं होतं. त्या रात्री बँकेच्या रोख रकमेवर डल्ला मारल्यानंतर प्रदीप कुमारने महागडी दारु खरेदी केली. त्यातले काही पैसे त्यांनं मोठ्या उदारपणे भिकाऱ्यांनाही वाटले. (रखो भाई ये पैसा....जरा जो बॉक्स है ना उसपर निगराणी रखना) असं सांगत
गोदामात पेट्या ठेवल्यानंतर त्यानं तिथल्या रखवालदाराला त्यानं या पेट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन हजार रुपये दिले.
पैशांच्या या पेट्या घेऊन जाण्यासाठी प्रदीप कुमारने एक टेंपोही भाड्यानं घेतला होता. पण त्याच्या दुर्दैवानं त्या रात्री त्याला टेंपोची वर्दी मिळाली नाही. हा टेंपो दुसऱ्या दिवशी येणार होता. हे सगळे पैसे घेऊन आपल्या बायको मुलासह पळून जाण्याचा प्रदीप कुमारचा प्लान होता. पण त्याच्या आतच तो पकडला गेला.
पुढच्या चौकशीत ज्या सिक्युरिटी एजन्सीकडे रोख रक्कम वाहून नेण्याचं काम दिले होते, त्या कंपनीकडून कामात मोठी कसूर झाल्याचे स्पष्ट झालं. या सिक्युरिटी एजन्सीला एका वेळी केवळ पाच कोटी रुपयांचीच रक्कम घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र, या व्हॅनमध्ये तब्बल २२ कोटी ५० लाख रुपयांच्या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. (Crime News)
या सगळ्या प्रकारात दिल्ली पोलिसांकडूनही मोठी चूक झाली होती. सप्टेंबर महिन्यात प्रदीप कुमार शुक्लाच्या पोलिस व्हेरिफिकेशनसाठी सुरक्षा एजन्सीनं पोलिसांना अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांचं त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. प्रदीप कुमारच्या नावावर पूर्वीचे गुन्हे असल्याचंही पुढील तपासात स्पष्ट झालं.
या साऱ्या प्रकारात एका रात्रीचा करोडपती प्रदीप कुमार शुक्ला केवळ बारा तासात सापडल्यानं बँकेची आणि दिल्ली पोलिसांची अब्रू मात्र वाचली एवढं खरं. दुसऱ्या बाजूला अत्यंत कमी वेळात या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे नाव लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये गेलं ही दिल्ली पोलिसांच्या दृष्टीने आणखी एक जमेची बाजू ठरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.