हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा  Saam Tv
ब्लॉग

हेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा

हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने विविध कोर्स विद्यार्थ्यांसी उपलब्ध केले आहेत. यामध्ये सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स ते 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्सही विद्यार्थ्यांना करता येतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने Tech Mahindra Foundation विविध कोर्स विद्यार्थ्यांसी उपलब्ध केले आहेत. यामध्ये सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स ते 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्सही विद्यार्थ्यांना करता येतो. महिंद्रा ग्रुपच्या टेक महिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरमध्ये हे सर्व कोर्स उपलब्ध आहेत.

अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशन काम करते. 2007 मध्ये टेक महिंद्रा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रात कंपनी काम करते. तसंच दिव्यांगांना सक्षम करण्याचं आणि त्यांना पायावर उभा करण्यासाठी कंपनी सातत्यानं प्रयत्न करत आहे. देशात 90 हून अधिक पार्टनर्ससोबत मिळून 11 ठिकाणी 150 पेक्षा जास्त सामाजिक प्रकल्पांवर काम सुरु आहे.

हे देखील पहा-

टेक महिंद्राचं भारतातलं मुख्य कार्यालय हे दिल्लीत आहे. याशिवाय 11 प्रादेशिक कार्यालये आहेत. यामाध्यमातून जवळपास 5 लाखांहून जास्त लाभार्थी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. शिक्षण आणि रोजगार या दोन क्षेत्रात 150 प्रकल्प सुरु आहेत. तसंच यामध्ये महिलांना समान संधी देण्यात येत असून दिव्यांगांसाठी 10 टक्के जागाही दिल्या जातात.

हेल्थकेअर प्रोफेशनल्स मध्ये करिअर करणाऱ्यांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने स्मार्ट अकॅडमीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विविध डिप्लोमा कोर्स असून त्यांचा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत आहे.

सर्टिफिकेट कोर्स शिक्षण

हॉस्पिटल फ्रंट ऑफिस अँड बिलिंग एक्झिक्युटीव्ह, जनरल ड्युटी असिस्टंट, होम हेल्थ एड यासाठी सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स आहे. तसंच नर्सिंग केअर, ऑप्थॅलमिक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन हे सर्टिफिकेट कोर्सेस एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करता येतात.

डिप्लोमा कोर्स

डिप्लोमा कोर्समध्ये डायलिसिस टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉडी या कोर्सेसचा समावेश आहे. डिप्लोमा कोर्सचा कालावधी हा दोन वर्षांचा आहे.

संस्थेची वैशिष्ठ्ये

टेक महिंद्रा स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअरच्या माध्यमातून पॅरामेडिकल डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमाशिवाय इतर कौशल्यांचा विकास व्हावा यादृष्टीनेही संस्था काम करते. विद्यार्थ्यांना सुसज्ज आणि अद्ययावत अशा लॅब उपलब्ध आहेत. कंपनीच्या सल्लागार आणि व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ आणि अनुभवींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधासुद्धा आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशांना आर्थिक मदतही पुरवली जाते. नामवंत आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप आणि नोकरीची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते.

संस्थेत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवल्या जातात. तसंच प्लेसमेंट असिस्टन्सची सुविधा दिली जाते. सर्व अकॅडमीमध्ये प्लेसमेंट रेट हा 75 टक्क्यांहून जास्त असून भारतातील जवळपास 70 रुग्णालये प्लेसमेंटच्या प्रक्रियेत सहभागी असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra Live News Update: देखभाल दुरुस्तीसाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा असणार बंद

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT