बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन Lock Down मूळे सतत शाळा Schools बंद आहेत. ग्रामीण Rural आणि आदिवासी Tribal भागात तर ऑनलाईन शिक्षण Online Education नसल्यात जमा आहे. त्यामुळे मात्र आदिवासी भागातील शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. बुलडाण्यातील आदिवासी भागातील शालेय विद्यार्थी आता वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलंय. Education situation in buldana rural area
बुलडाणा Buldana जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद या आदिवासी परिसरात कुणी पत्ते खेळतं तर कुणी पैसे लावून लगोरी. शाळा सततच्या लोकडाऊन मुळे बंद असल्याने व या परिसरात मोबाईल नेटवर्क Mobile Network नसल्याने जवळपास सहा हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांचं भविष्य अंध:कारमय झालं आहे. यामुळे या आदिवासी भागात शालेय विद्यार्थी व्यसनाधीन झाली आहेत.
शाळा नसल्याने शालेय विद्यार्थी कुठे पत्ते तर कुठे पैसे लावून वेगवेगळे खेळ खेळत आहेत. काही ठिकाणी चक्क शाळेच्या आवारात शालेय विद्यार्थी मद्यपान करताना दिसत आहेत. आदिवासी भागातील हे भयावह दृश्य आता समोर आल्याने या आदिवासी लहानग्यांना भविष्यात मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणणे हे शिक्षकांसमोर Teachers एक मोठं आव्हान असणार आहे.......! Education situation in buldana rural area
आदिवासी भागातील तालुका मुख्यालय असलेल्या संग्रामपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर चक्क मुख्याध्यापकांच्या कार्यालयासमोर दारूच्या बाटल्यांचा खच, रिकामे ग्लास, सिगारेट बिडीची पाकिटे आढळली..... यामुळे जर तालुका मुख्यालयी Head Quarterअशी परिस्थिती असेल तर दुर्गम अशा आदिवासी भागात तर शालेय विद्यार्थी कसे रहात असतील हे न सांगितलेलंच बर....!
ही परिस्थिती काही ग्रामीण आणि आदिवासी भागातीलचं आहे असं नाही....अनेक शहरी भागातील शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेली दिसतात. काही संगीत तज्ज्ञांच्या मते अशा विद्यार्थ्यांना संगीताच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या दिशेनं नेलं जाऊ शकतं. काही बाल मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अशी मुले कमी वयात व्यसनाधीन झाल्यास गुन्हेगारी प्रवृत्ती अशा मुलांमध्ये वाढते. यामुळे याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.Education situation in buldana rural area
एकंदरीत आदिवासी भागातील शैक्षणिक परिस्थिती बघता नव्या पिढीचं शैक्षणिक नुकसान हे आधीच झालं आहे. मात्र आगामी काळात या पिढीचं अधिक नुकसान थांबवायचं असेल तर सरकारने आताच पावले उचलणे महत्त्वाचे आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.