Xi Jinping
Xi Jinping Saam TV
ब्लॉग

Xi Jinping: चिनी जनतेला का नकोत शी जिंगपिंग?

साम वृत्तसंथा

पुनित कुलकर्णी

Blog About Xi Jinping: सध्या जागतिक स्तरावर अनेक गोष्टी सुरू आहेत. यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध असो, ब्रिटनमध्ये झालेली पंतप्रधानपदाची शर्यत असो. इराणमधील आंदोलन असो किंवा रशियामध्ये सुरू असलेला मोबिलायझेशनचा (mobilization) मुद्दा असो. जगाच्या पटलावर अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे, परंतु त्यात अजून एक गोष्टींची भर पडली आहे ती म्हणजे चीन या देशाची..! चीन (China) हा भारतीयांसह जगभरातील अनेक देशांसाठी कुतुहलाचा विषय असतो. कारण चीनमधील देशांर्तगत हालचाल सहजरित्या बाहेर येत नाहीत. (Indo-China Latest News)

चीन म्हटलं की आता कोणत्या प्रदेशावर या देशाने आपला दावा सांगितला असाच प्रश्न मनात येतो. पण या वेळेस काळाचे चक्र उलटं फिरलं असे दिसते आहे. कारण या देशातच अध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे प्रथमदर्शनी समजते आहे. झाले असे की, गेल्या १५ आणि १६ ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या समरकंद शहरात जी SCO (शांघाय सहकार्य संघटना) यांची जी २२ वी वार्षिक शिखर परिषद झाली त्यामध्ये जिनपिंग हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी या परिषदेत भाग घेतला. परिषद संपवून ते आपल्या देशात गेले तर त्यांना PLA (पीपल्स लिब्रेशन आर्मी ) म्हणजेच त्यांच्या लष्कराकडून (China Army) ताब्यात घेण्यात आले. सध्या शी जिंगपिंग आपल्याच घरात नजरकैदेत आहे असे म्हटले जात आहे.

चीनची राजधानी बीजिंग (Beijing) सध्या आर्मीच्या नियंत्रणाखाली असल्याचं विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांतील वृत्तांमधून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या वृत्तांमधून असाही दावा केला जात आहे की, बीजिंगकडे जाणाऱ्या आणि बीजिंगहून निघणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणं स्थगित करण्यात आले आहेत. याद्वारे बीजिंग शहराचा संपर्क जगापासून तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे मानले जात आहे. परंतु चीनच्या सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहीती याबाबत देण्यात आली नाही.

या प्रकरणात असे सांगितले जाते की, शी जिंगपिग यांचे देशाबाबत असणारे धोरण तेथील जनता आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाला पटलेले नाही त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे. असे २-३ मुद्दे आहेत ज्यामुळे चीनमधील जनतेला जिनपिंग नकोसे झाले आहेत.

१) कोविड काळात चुकीच्या पद्धतीने केलेली हाताळणी

कोरोनाचा पहिला रुग्ण चीन मध्येच आढळला आणि बघता बघता संपूर्ण चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. यावर नियंत्रण आणण्यासाठी चीनने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करत सर्व प्रकारच्या योजना आखल्या. जाचक अटी लावून लोकांवर नियंत्रण आणले. त्याचवेळेस समाज माध्यमावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात त्या देशाने कोरोनामुळे मृत पावलेल्या लोकांचा ढीग करून त्यांना एकत्र जाळले होते. यासर्व गोष्टींमुळे तेथील जनतेमधला रोष प्रचंड प्रमाणात वाढला.

२) मोठमोठ्या कंपन्यांनी घेतला चीनमधून काढता पाय

मधल्या काळात या देशाने तेथील मोठमोठ्या कंपन्यानवर काही बंधनं टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतला. तसेच त्यामुळे तिकडच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

३) चिनी जनतेवर टाकलेले आर्थिक बंधने

सद्यस्थितीत लोक आपल्या कर्जाचे हप्ते फेडू शकत नाही. त्याचबरोबर लोकांचा आर्थिक व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. मधल्या काही काळामध्ये तर चीन सरकारने लोकांना आपल्या बँकेतील ठेवी काढण्यापासून मज्जाव केला होता त्यामुळे तेथील लोकांमध्ये चिंता वाढली होती आणि याचे रुपांतर लोक आक्रमक झाल्याचे समोर आले. त्यामुळे सैन्याला त्यांच्या बँकाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावे लागले होते.

असे म्हटले जात आहे की, शी जिनपिंग यांना या उठावाची आधीपासूनच चिंता होती. कारण दोन-तीन वर्षांपासून ते देश सोडून कुठेच गेलेले नव्हते. पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा उठाव झाला असावा असे मानले जात आहे. या सर्व गोष्टींमध्ये चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जिंताओ आणि माजी पंतप्रधान जिबाओ हे असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सुरुवातीला CGB (सेंट्रल गार्ड ब्युरो) वर ताबा मिळून जिंगपिंग यांच्या सत्तेला आव्हान दिले आहे. या सर्व बाबतीत किती खरं किती खोटं ही येणारी वेळच ठरवेल. कारण चीनमधील कोणत्याच प्रकारची माहिती जगासमोर येत नाही आणि जरी आली तरी ती यायला बराच वेळ लागतो.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT