बातम्या

जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी विनेश फोगट पात्र

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीचा जागतिक कुस्ती स्पर्धेतून टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. काल (ता.17) जपानच्या मायुकडून पराभूत झाल्याने तिला ब्राँझपदकाची संधी होती, मात्र तिला रिपिचेजला दोन लढती जिंकणे आवश्यक होते.  2020 मध्ये होणाऱ्या टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती यंदाची पहिली कुस्तीपटू आहे. 

पहिल्या फोरीत विनेशने स्वीडनच्या मॅटसनला 13-0ने तांत्रिक गुणाधिक्यावर पराभूत केले. मात्र, दुसऱ्या फेरीत मायूकडून तिला 7-0 असा पराभव स्वीकारावा लागला. जपानच्या मायुने अंतिम फेरी गाठल्यने विनेशला रिपेचेजची संधी मिळाली. रिपेचेजमध्ये तिने पहिल्या लढतीत युक्रेनच्या ब्लाहिनयाला 5-0 असे पराभूत केले. 

दुसऱ्या लढतीतने तिने अमेरिकेच्या साराहला 8-2ने पराभूत केले. आता आज होणाऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत विनेश पराभूत झाली तरीही नियमांनुसार पहिले सहा कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात, त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या ब्राँझपदकाच्या लढतीत विनेश पराभूत झाली तरी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल. 


Web Title: Wrestler Vinesh Phogat qualified for Tokyo Olympics 2020
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

Baramati Lok Sabha: बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळेल; आमदार रोहित पवारांना विश्वास

Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Baramati News | EVM वर कमळाचं चिन्हच नाही, बारामतीचे आजोबा संतापले

Live Breaking News : Raigad Breaking : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

SCROLL FOR NEXT