बातम्या

वर्ल्ड किडनी डे! किडनीची काळजी घ्या

साम टीव्ही

मुंबई: शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.
मात्र योग्य ती काळजी घेतली नाही तर किडनीचे विकार जडतात. किडनीचे विकार सर्व वयोगटात दिसून येतात. योग्य ती काळजी घेतली नाही तर विपरीत परिणाम होऊ शकतात. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते आणि दररोज जवळपास 180 लिटर इतके रक्त शुद्ध करते.

लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून पू येणे, पोटात सतत दुखणे किंवा चेहरा सुजणे ही  किडनीच्या आजाराची लक्षणे आहेत. 
मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सूज येणे यासारख्या कारणांमुळे देखील किडनीवर परिणाम होतो. 

किडनीच्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. दोन्ही मूत्रपिंडांचे काम करणे बंद झाल्यास म्हणजे किडनी निकामी झाल्यास डायलिसिस हा एकमेव पर्याय आहे. डायलिसिस म्हणजे किडनीचे काम मशिनने करणे. वर्षानुवर्षे डायलिसिसच्या साथीने आयुष्य जगणारे अनेक पेशंट आहेत. डायलिसिस अशक्य झालेल्या पेशंटना किडनी ट्रांसप्लान्टचा पर्याय आहे.

मात्र हे सगळे टाळायचे असेल तर वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. त्या बरोबरच मीठाचे प्रमाण कमी केले तर उत्तम! 

Webtitle: World Kidney Day! How to take care of kidney?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : नाद करा पण यांचा कुठं; बस पकडण्यासाठी आजोबा थेट खिडकीतून आत शिरले, अनोखा जुगाड व्हायरल

Panchayat 3 : 'पंचायत ३' केव्हा रिलीज होणार? प्राईम व्हिडीओने शेअर केलेला नवीन व्हिडीओ एकदा बघाच

Hydrate Foods : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणारच नाही! डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Girls Fight Video: रिल्सच्या कमेंटवरून पोरींमध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी हाणामारी करत भर रस्त्यातच भिडल्या, VIDEO व्हायरल

Jalgaon Crime : मजा मस्तीत दोन मित्रांमध्ये वाद; वादातून चाकूने केला वार

SCROLL FOR NEXT