Saam Banner Template
Saam Banner Template 
बातम्या

भारत-इस्त्राईलचे संबंध कसे असतील? ; नवीन पंतप्रधान नेफ्ताली बेन्नेट कोण आहेत?

वृत्तसंस्था

जेरुसलेम: इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या जागी देशाची कमांड आता कट्टरपंथी नेफ्ताली बेन्नेट (Naftali Bennett) यांच्या ताब्यात आहे. नेतान्याहू यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. आठ-पक्षाच्या युती सरकारमधील खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच अरब मुस्लिम पक्ष यांचा देखील सरकारमध्ये समावेश आहे. बेनेट यांना इस्त्राईलमध्ये अशा वेळी सत्ता मिळणार आहे जेव्हा देशाला अपार आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तथापि, नाफ्ताली बेन्नेट्ट यांच्या पुढे मोठे आव्हान काय असेल? भारत-इस्राईल संबंधांवर काय परिणाम होईल? 

इस्रायलचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? 

* 49 वर्षीय नेफ्ताली बेन्नेट इस्त्राईलचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडले गेले. एकेकाळी बेनेट हे माजी पंतप्रधान नेतान्याहू यांचे अगदी जवळचे मानले जात होते. 

* 2006 ते 2008 या काळात ते इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ होते. २०१३ मध्ये प्रथमच कट्टरपंथी पार्टीमधून निवडून आले. 2019 पर्यंत ते प्रत्येक आघाडी सरकारमधील मंत्री होते.

* नेफ्ताली बेन्नेट केवळ यहूदी राज्यासाठी लॉबींग करत आहे. ते राजकारणा व्यतिरिक्त ते व्यापारी देखील आहेत. ते कट्टरपंथीयांना फाशी देण्याच्या बाजूने आहे. ते पश्चिम किनारपट्टीमध्ये वस्ती वाढवण्यासाठी तयार आहेत. पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

* वामपंथी पक्ष, मध्यमार्गी पक्ष आणि अरब पक्ष हेदेखील त्यांच्याबरोबर सरकारमध्ये भागीदार आहेत. बेनेट यांनी जैर लॅपीडबरोबर युती केली आहे.

हे देखील पाहा

भारत आणि इस्रायलमधील मैत्री चांगली
अभ्यासक म्हणतात की भारत आणि इस्रायलमधील मैत्री चांगली आहे. दोन्ही देश दहशतवाद आणि कट्टरतावादाने त्रस्त आहेत. भारत आणि इस्त्राईल दोघेही या आघाडीवर एकत्र लढत आहेत. अलिकडच्या काळात दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठीही दोन्ही देश एकमेकांचे सामरिक भागीदार आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सामरिक संबंधही आहेत. इस्रायल भारतीय सैन्याला अनेक प्रकारची शस्त्रे  पुरवतो. शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात इस्त्राईलचा मोठा वाटा आहे.

Etited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT