बातम्या

VIDEO  | विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क

हिंदू महासभेचे नेते असलेले रणजीत बच्चन हे मुळचे गोरखपूर येथील होते. ते लखनौमधील हजरतगंज भागातील ओसीआर या इमारतीत राहत होते. गोळीबारानंतर पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली असून, हल्लेखोरांचा तपास सुरु आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील हजरतगंज भागात हिंदू महासभेचा नेता रणजीत बच्चन याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना रणजीत बच्चन यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार झाला तेव्हा, त्यांच्यासोबत त्यांचा भाऊही होता. त्याच्याही हाताला गोळी लागली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंदू महासभेचे नेते असलेले रणजीत बच्चन हे मुळचे गोरखपूर येथील होते. ते लखनौमधील हजरतगंज भागातील ओसीआर या इमारतीत राहत होते. गोळीबारानंतर पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली असून, हल्लेखोरांचा तपास सुरु आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हिंदुत्ववादी नेते कमलेश तिवारी यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. 

Web Title: Vishwa Hindu Mahasabha chief Ranjit Bachchan shot dead in Lucknow

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Rai Net Worth: अभिनेत्री ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती आहे

Maharashtra Live News Update: चंद्रपुरातील इथेनॉल कंपनीत स्फोट

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT