बातम्या

वर्दळीच्या रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती ?

संदीप चव्हाण

माणसाला शीर नसेल तर तो कसा काय चालू, फिरू शकेल ? पण, गर्दीतल्या रस्त्यावर शीर नसलेली व्यक्ती फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.शीर नसलेली ही व्यक्ती आहे तरी कोण ? खरंच या व्यक्तीला शीर नाहीये का ? याची आम्ही पडताळणी केली.

गर्दीच्या रस्त्यावरून शीर नसलेली व्यक्ती फिरतेय ती कोण आहे याचीच चर्चा होतेय.ही व्यक्ती फक्त धड असलेलं शरीर घेऊन रस्त्यानं चालत होती.पुण्यासारख्या गर्दीच्या शहरात ही व्यक्ती फिरत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.पण, खरंच ही व्यक्ती पुण्यात फिरतेय का ? अनेकजण हा प्रश्न विचारतायत.त्यामुळे याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात गल्ली गल्लीत गर्दी, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम हे आपल्याला नित्याचं.पण अशातच अचानक या गर्दीत रस्त्यावर अचानक डोकं म्हणजेच शीर नसलेला माणूस दिसला तर चर्चा झाली असती.पण, अशी कोणतीही चर्चा नाही, बातमी नाही.मग ही शीर नसलेली व्यक्ती आहे तरी कोण ? व्हिडिओत शीर नसलेली व्यक्ती ट्रॅफिकमधून वाट काढताना दिसतेय.अंगावर लेदरचं जॅकेट,थ्री फोर्थ पॅन्ट, पायात चपला आणि हातात लाल पिशवी असा तिचा पेहराव आहे.पण, हातातल्या पिशवीत त्याचं शीर तर नाही ना ? असाही प्रश्न अनेकांना पडला.मात्र, ट्राफिक आहे, गाड्या ये जा करतायत.कुणीही या माणसाला घाबरत नाहीये. व्हिडीओत निरखून पाहिला त्यावेळी मागे बोर्ड चीनी भाषेत लिहिलेले दिसून आले.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय व्हायरल सत्य समोर आलं पाहा.


व्हिडिओ पुण्यातला असल्याचा दावा केला पण, पुण्यातला नसून चीनचा आहे

संबंधित व्यक्तीने शीर नाही हे दाखवण्यासाठी ट्रिक वापरलीय

व्हिडिओ एडिटेड असून, यू ट्यूबवर अपलोड केलाय

सध्याच्या घडीला अनेकजण यूट्यूब चॅनेलचा वापर करतायत.आपल्या चॅनेलचे सबक्राईबर वाढावेत म्हणून काहीना काही ट्रिक वापरली जाते.अशाच प्रकारे ही ट्रिक वापरण्यात आली आणि शीर नसलेली व्यक्ती रस्त्यावरून चालतेय असं दाखवण्यात आलं.पण, असं काहीही नसून, लोकांची दिशाभूल करण्यात आलीय...त्यामुळे असे व्हिडीओ पाहून विश्वास ठेवू नका.

पाहा व्हिडीओ ः https://www.youtube.com/watch?v=dUlMWqWAJ3U

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कणकवलीत होणार राज ठाकरेंची सभा

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

SCROLL FOR NEXT