akola flood
akola flood 
बातम्या

अकोला जिल्‍ह्यातील ७७ गावांना पुराचा धोका !

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

अकाेला - उन्हाचे प्रमाण कमी होत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाळ्याची Rain चाहुल लागली आहे. पावसाळ्यात वेळप्रसंगी उद्‍भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात संभाव्य पूरबाधित ठिकाणी ७७ असून संबंधित गावांना पुराच्या Flood तडाख्याची भीती आहे. त्यादृष्टीने पूरनियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.  villages in Akola district at risk of flood

अती पावसामुळे जिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानुर, मोर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना पूर येताे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानि, सामाजिक जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. नदीकाठावरील गावात, वाडी-वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जाते. तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागते. पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर बाधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यावेळी प्रशासन, लोकप्रतिनिधींची धावाधाव होते. पूर ओसरल्यानंतर हा विषय बेदखल केला जातो.

वर्षानुवर्षे अशीच स्थिती आहे. त्यानंतर सुद्धा सरकारी पातळीवरून सकारात्मक कार्यवाही करण्यात येत नाही. प्रत्येक वर्षी नदीकाठच्या गावांना पूराच्या गंभीर धोक्यापासून होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करण्यासाठी ग्रामीण पातळीवर ग्राम आपत्ती निवारण दल स्थापन केले जाते. त्यासाेबतच जिल्हास्तरावर आपत्ती निवारण पथक कार्यान्वित करुन नागरिकांचा बचाव करण्याचे काम केले जाते. villages in Akola district at risk of flood

हे देखील पहा -

दरम्यान यंदाही जिल्ह्यातील ७७ गावांना पूराचा धोका असून, नदीकाठच्या गावांना ब्लू आणि रेडलाइनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाेबतच इतर गावांनाही पूराच्या दृष्टीकोणातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

SCROLL FOR NEXT