Doctor
Doctor 
बातम्या

विनापरवाना कोव्‍हीड रुग्‍णांवर उपचार करणा-या ३ रुग्णालयांवर कारवाई

जयेश गावंडे

अकोला : महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये ३ खाजगी रुग्‍णालये बिना परवानगीने कोव्‍हीड Covid रुग्‍णांवर उपचार करत असल्‍याने आज मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये त्‍यांच्‍यावर १० लाख रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. Three Hospitals in Akola fined running Covid hospital without permission

अकोला Akola महानगरपालिका क्षेत्रातील राम नगर येथील डॉ.नरेंद्र सरोदे, श्र्वास हॉस्‍पीटल यांच्‍याकडे जिल्‍हास्‍तरीय सुकाणु समिती अकोला Sukanu Committee Akola यांनी तपासणी केली असता, हा प्रकार आढळला.

अनाधिकृतरित्‍या परवानगी न घेता ७ कोव्‍हीड Corona संशयीत रुग्‍णांना भरती केल्‍याचे आढळून आले. तसेच सदर रुग्‍णांना नियमांचे उल्‍लंघन Violation of rules करून रेमडेसीवीर Remdesivir इंजेक्‍शन सुरू केलेले आढळून आल्‍याने त्यांना नियमांचे पालन न केल्‍यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५३ नुसार २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे. Three Hospitals in Akola fined running Covid hospital without permission

त्याचप्रमाणे  कौलखेड येथील डॉ.स्‍वप्‍नील प्रकाशराव देशमुख, फिनिक्‍स  हॉस्‍पीटल यांच्‍या कडे जिल्‍हा स्‍तरीय सुकाणु समिती अकोला यांनी तपासणी केली असता या हाॅस्पीटलमध्ये अनाधिकृतरित्‍या परवानगी न घेता ९ खाटांवर कोरोना रुग्‍णांना भरती केलेले आढळून आले. 

या रुग्‍णालयाच्‍या पॅनलवर कुठलेही तज्ञ डॉक्‍टर Doctor नसतांना कोव्‍हीड सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांना भरती करून रूग्‍णांच्‍या संमती पत्राविना इतर नियमांचे उल्‍लंघन करत रेमडिसीवीरचे इंजेक्‍शन देण्‍यात येत असल्‍याचे आढळून आल्‍यामुळे तसेच नियमांचे पालन न केल्‍यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ चे नियम ५१ (ब) व ५३ नुसार त्‍यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे. Three Hospitals in Akola fined running Covid hospital without permission

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील महाजनी प्‍लॉट येथील डॉ.सागर थोटे, थोटे हॉस्‍पीटल व चेस्‍ट  क्लिनिक, अकोला यांच्‍याकडे जिल्‍हास्‍तरीय सुकाणु समिती अकोला यांनी तपासणी केली असता डॉ.थोटे यांनी दुस-या ठिकाणी अनाधिकृतरित्‍या कोव्‍हीड केअर सेंटर सुरू करून १३ कोव्‍हीड संशयीत रुग्‍णांना भरती करून  नियमांचे उल्‍लंघन करत त्‍यांना रेमडिसीवीरचे इंजेक्‍शन सुरू आढळून आले. म्‍हणून त्‍यांच्‍यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ चे नियम ५१ (ब) व ५३ नुसार त्‍यांना ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे. उपरोक्‍त कायद्यान्‍वये संबंधीतांनी १५ दिवसाच्‍या आत दंड न भरल्‍यास त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. त्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha: ठाणे-कल्याणचं ठरलं, आता नाशिकचं कधी? चंद्रशेखर बावनकुळेंनी भुजबळांसमोरच सांगितलं

Today's Marathi News Live : नाशिक लोकसभेच्या जागेची घोषणा CM शिंदे करणार - संजय शिरसाट

Covishield Vaccine : घाबरू नका! Covishield घातक नाही; कोरोनाविषयी प्रत्येक अपडेट देणाऱ्या डॉक्टरांचा व्हिडिओ आला समोर

Almond Benefits: उन्हाळ्यात बदाम खाण्याची योग्य पध्दत जाणून घ्या

Maharashtra Politics : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT