बातम्या

जामा मस्जिद परिसरात तणाव

सकाळ न्यूज नेटवर्क


दिल्ली Protest against CAA : जुन्या दिल्लीतील जामा मस्जिद परिसरात आज, शुक्रवारच्या सकाळच्या नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र आला. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पोस्टर्स घेऊन, नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेण्याची मागणी जमावाकडून करण्यात येत आहे.


भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद या जमावात दिसले असून, ते या जमावाचे नेतृत्व करत असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. आझाद यांनी जामा मस्जिद ते जंतर-मंतर मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. एनएनआयच्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जामा मस्जिद परिसरात दाखल झाले असून, जमाव शांततेने तेथून निघून जावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. आंदोलकांनी जामा मस्जिदच्या पायऱ्या आणि आजू-बाजूचे सर्व रस्ते व्यापले आहेत. तरुणांचा खूप मोठा जमाव तिरंगा घेऊन या परिसरात दाखल झाला आहे. 

काय घडले? 

राजधानी दिल्ली सकाळपासून तणावाखाली 
शहरात सकाळपासून वेगवेगळे 40 मोर्चे निघाले 
दिल्लीतील जामा मस्जिद परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र आला 
आंदोलकांची गांधीगिरी, पोलिसांचे फूल देऊन स्वागत
जमावावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर
पोलिसांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 


काय आहे कायदा?

सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. त्यानुसार भारताच्या शेजारील बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. 31 डिसेंबर 2014पूर्वीचे वास्तव्य सिद्ध करण्यात यशस्वी ठरल्यास त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. या अल्पसंख्याकांच्या यादीत हिंदू, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारसी आणि जैन समाजाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरातून या कायद्याला विरोध वाढत आहे. 

Web Title: protesters gather outside jama masjid delhi against caa

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT