ned betty.jpg 
बातम्या

सुपरमॅन आणि डिलिव्हरेन्स स्टार नेड बिट्टीचे निधन 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : 'सुपरमॅन' Superman, 'नेटवर्क' Deliverance यासारख्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते नेड बिट्टी Ned Beatty यांचे नुकतेच निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. अमेरिकेत लॉस एंजेलिस येथील त्यांच्या  राहत्या घरी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या मृत्यूचे करण अद्याप समोर आलेले नाही. बीट्टी यांच्या पश्चात पत्नी सँड्रा जॉन्सन, त्यांची आठ मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.( Superman and Deliverance star Ned Beatty has passes away) 

जन्म 1937 मध्ये नेड बिट्टी यांचा जन्म झाला. तर 1972 मध्ये आलेल्या डिलिव्हरेन्समधील बॉबी ट्रिप्पेच्या भूमिकेमुळे बिट्टी प्रसिद्धी झोतात आला. त्यांनी नॅशविले, नेटवर्क, द बिग इझी आणि इतर बर्‍याच भूमिकांमधून चित्रपटांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. चित्रपट सृष्टीत पाच दशकाहून अधिक काळ नेड बीट्टीची कारकीर्द  राहिली.  अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये बिट्टीने अविस्मरणीय भूमिका साकारल्या.

1976 मध्ये 'नेटवर्क' या सिनेमातिल त्याची टेलिव्हिजन प्रमुखाची  भूमिका आजही सर्वांना चांगलीच आठवते. याच चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतेपदाची नामांकन मिळाले. 'डिलिव्हरेन्स', 'फ्रेंडली फायर', 'ऑल द प्रेसिडेंट मॅन', 'सिल्व्हर स्ट्रीक', 'बॅक टू स्कूल', 'नॅशव्हिल', 'द टॉय', 'कॅप्टन अमेरिका' ही त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.  त्याचबरोबर, 'लॉ अँड ऑर्डर', 'रोझेन', 'द बॉईज', 'हायवे टू हेव्हन', 'अमेरिकन प्लेहाउस' अशा अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्येही नेड बिट्टीने अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. 

Edited By - Anuradha Dhawade 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT