Mumbai Subarban Train
Mumbai Subarban Train 
बातम्या

रेल्वे मार्गावरील मध्य आणि हार्बरच्या मार्गावर उद्या असा असेल मेगा ब्लाॅक

साम टीव्ही ब्युरो

मुंबई : मध्य रेल्वे उद्या ता. ४ रोजी रोजी  मुंबई (Mumbai) विभागातील उपनगरी भागांवर देखभालीचे काम करण्यासाठी मेगा ब्लॉक (Megablock) करणार आहे ठाणे-कल्याण (Thane Kalyan) अप-डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.

मुलुंड (Mulund) येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणा-या डाउन धीम्या आणि अर्धजलद मार्गावरील सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन  जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा ठाणे (Thane), दिवा (Diva) आणि डोंबिवली (Dombivali) या स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रक (Timetable) नुसार १० मिनिटे उशिराने आपल्या निश्चित स्थानी पोहोचतील. Sunday mega block on Mumbai Central Railway Local Route

कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणा-या  धिम्या-अर्धजलद अप मार्गावरील सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळविल्या जातील आणि डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील, पुढे मुलुंडला अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि पत्रकाच्या वेळेप्रमाणे १० मिनिटे उशीराने पोहोचेल .

ब्लॉक कालावधी दरम्यान कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकूर्ली स्थानकांवरील रेल्वे उपनगरी सेवा उपलब्ध होणार नाहीत. अप आणि डाउन हार्बर पनवेल - वाशी या मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत नेरुळ बेलापूर-खारकोपर हार्बर लाईनसह हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल - बेलापूर करीता सुटणारी आणि अप हार्बर मार्गावर पनवेल - बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) करीता सुटणाऱ्या सेवा रद्द करण्यात येतील. 

ट्रान्सहार्बर (Transharbour) या मार्गावरून पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणे मार्गाकडे जाणाऱ्या  तर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेलला जाणा-या सेवा बंद राहतील. Sunday mega block on Mumbai Central Railway Local Route

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील कुर्ला (Kurla) या विभागात विशेष गाड्या चालविल्या जातील.ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी  नेरूळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असेल.. 

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शिक्षकाच्या मुलाला हरवण्यासाठी पंतप्रधान मैदानात, हाच माझा विजय - निलेश लंके

Jitendra Awhad News | Jitendra Awhad News | एकनाथ शिंदेंना मी ठाणं दाखवलं, म्हस्के नारायण राणेंसोबत पळून जाणार होते - आव्हाड

ICC T20 World Cup 2024: मोठी बातमी! टी -२० वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट

Mumbai North East : मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार पडणार; अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT