बातम्या

Nisarga चक्रीवादळ : ....आणि रायगडच्या श्रीवर्धन- हरिहरेश्वर किनारपट्टीला

साम टीव्ही न्यूज

अलिबाग :सोमवारी पहाटे मुंबई शहरासह उपनगरात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व सरींमुळे वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाला. चेंबूर, कुर्ला, सायन अंधेरी, दादरसह दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम मुंबई अशा बहुतांश सर्वच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाने नंतर विश्रांती घेतली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरावर दिवसभर ढग दाटून आले होते.चक्रीवादळाचा सामना करताना घ्यायची खबरदारी आणि उपाय योजना याबाबत चर्चा झाली. बैठक उशिरापर्यंत सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.


जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे व पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनीही उपाययोजनांची माहिती दिली. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोस्ट गार्ड, आयएमआरडी, राज्य आपत्कालीन यंत्रणेशी आपण सतत संपर्कात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले.रायगड, पालघर किनारपट्टी आणि दमणला बुधवारी, ३ पालघरचे जूनला असलेला चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रायगडच्या श्रीवर्धन- हरिहरेश्वर किनारपट्टीला हे वादळ आदळेल, असा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसह किनारपट्टी परिसरातील दुकाने, कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


किनारपट्टी भागात ३ जूनला रेशनिंग दुकाने व किरकोळ केरोसिन परवानाधारकांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी अन्नधान्याचे वितरण होणार नाही.रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्कालीन प्रसंगी कोस्टल हेल्पलाइन क्रमांक १०९३ व पोलीस नियंत्रण कक्ष ७४४७७११११० वर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. अरबी समुद्रात मंगळवारी चक्रीवादळ तयार होण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त करताच जिल्हा प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले. राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे-निंबाळकर यांनी किनारपट्टी भागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची सायंकाळी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.

WebTittle : the Shrivardhan-Harihareshwar coast of Raigad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

Dhananjay Munde On Uddhav Thackeray | मुंडेंचा फोन ठाकरेंनी टाळला! किस्सा काय?

Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Shubman Gill Statement: पराभवाच्या हॅट्रिकनंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Today's Marathi News Live : बीड बायपास परिसरात टोळक्याची दहशत; कोट्यवधीच्या जमिनीसाठी दुसऱ्यांदा महिलांवर हल्ला

SCROLL FOR NEXT