बातम्या

शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेणार : संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेसाठी शिवतीर्थ हे पवित्र असून, त्य़ाठिकाणीच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिक जनतेसमोर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल. शिवसेना कधीही झुकणार नाही. शिवसेना स्वाभिमानाने त्यांचा हक्क घेईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

राज्यातील जनतेला हेच पाहिजे आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. खोटं बोलणाऱ्यांना घरी बसवा असे सांगत संजय राऊत यांनी युतीतील मित्रपक्ष भाजपला इशाराच दिला आहे. आता चर्चा मुख्यमंत्री पदावरच होईल, असे सांगत युतीतील चर्चा अद्याप पुढे झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.  महाराष्ट्र मनान आणि विचाराने मुक्त झाला आहे. 

संजय राऊत म्हणाले, की सरकारी यंत्रणांचा वापर केला जात आहे. याचा गौप्यस्फोट लवकरच आम्ही करू. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. 21 तारखेला मतदार संपल्यानंतर अफवांचे कारखाने संपुष्टात आले आहेत. अफवांचा कारखाना कुठे हे माहिती आहे. मुख्यमंत्र्यांता शपथविधी कुठे होणार हे माहिती नाही. कुठलही मैदान बुक करा आम्हाला फरक पडत नाही. राजकीयदृष्ट्या सामनातून भाष्य केले आहे. भाजपकडून तो मी नव्हेच अशी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांनी चर्चा थांबविली आहे. अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. गणितं जुळली की ते माध्यमांसमोर येतील. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. कर्नाटकात ऑपरेशन कमळ समोर आले आहे. अशा गोष्टी महाराष्ट्रात

चालणार नाही. राज्यात खोटारडेपणा चालणार नाही. जनता त्यांना धडा शिकवेल. हरियानाचा तिढा सोडविण्यासाठी अमित शहांना पुढाकार घेतला. पण, महाराष्ट्रात त्यांनी पुढाकार न घेणे हे रहस्यमय आहे. अमित शहांनी महाराष्ट्रात जास्त लक्ष दिले नाही, हे सत्य आहे. शिवसेना बाजारात बसलेली नाही, कोणतेही फॉर्म्युला स्वीकारण्यासाठी. आम्ही पाहिजे तेव्हा शरद पवार यांचे मार्गदर्शन घेऊ.

आमचा 175 चा आकडा आहे, ऑपरेशन कमळ चालणार नाही
आमच्याकडे आमदारांची संख्या 175 पर्यंत गेली आहे. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ चालणार नाही. सत्ताधाऱ्यांना ईडी, सीबीआयचा गैरवापर अंगलट येईल, असे सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.


Web Title: Shivsena MP Sanjay Raut claims next CM in Maharashtra is Shivsainik
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT