बातम्या

आज शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क


शिखर बँकेशी कुठलाच संबंध नसताना आपल्यावर ईडीने गुन्हेगारीच्या यादीत आपले नाव टाकले आहे. आमच्या बापजाद्यांना कधी गुन्हेगारी केली नाही. शिखर बँकेच्या त्या ७० संचालकांमध्ये भाजप शिवसेनेचीही मंडळी आहेत. ईडीच्या नावाने काय कारवाई करायची ती करा त्याची चिंता आम्हाला नाही. अशा खूप कारवाया पाहिल्या आहेत, असा टोला पवार यांनी ठिकठिकाणच्या सभेत लगावला. ज्यांच्या हातात सत्ता आहे ती काढून घेऊन माणुसकीने सत्ता कशी चालवायची हे दाखवून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातून आपल्या प्रचार दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. तत्पूर्वी शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्याठिकाणी मोठे शक्तिप्रदर्शन घडविले.


दोन्ही काँग्रेस आघाडीतील जागावाटपाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी आज, बुधवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी येथे दिली. 

मंगळवारी दुपारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे जाहीर सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधला. गुरुवार ३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मुंब्रा, ठाणे येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. तर शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी बिद्री, राधानगरी, कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहेत, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोकणातील चिपळूण मतदारसंघात शेखर निकम, मुरबाड मतदारसंघात प्रमोद हिंदुराव, अंमळनेर मतदारसंघात अनिल भायदास पाटील, चोपडा मतदारसंघात जगदीश वळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले.

Web Title sharad pawar starts his campaign for assembly elections in maharashtra from marathwada
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT