बातम्या

अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. : रोहित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क


पुणे : अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मोबाईल बंद ठेवून तब्बल 18 तास ते 'नॉट रिचेबल' होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सकाळी बोलणे झाले, असे अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच पवारसाहेब हे अजितदादांच्या वडिलांसारखे आहेत, असेही ते म्हणाले.

बारामतीतील कऱ्हा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रोहित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, केवळ मी यामध्ये असल्यानेच मला टार्गेट केले जात आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. बँकेतील कारवाईत मोठी आकडेवारी करून ते फक्त पवार कुटुंबाला टार्गेट करत असतील तर अजित पवारदेखील माणूसच आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली.

दरम्यान, राज्यात सध्या पूर परिस्थिती आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना फक्त आणि फक्त विरोधक या गोष्टी समोर आणून वेळ पाहत आहेत, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तसेच बैठकीला जाऊन गर्दी करण्यास योग्य नव्हते. त्यामुळे गेलो नाही, असेही ते म्हणाले.  

Web Title: Rohit Pawar statement on Ajit Pawar and Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha 2019
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : देवेंद्र फडणवीसांविरोधात रचला होता मोठा कट, मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT