बातम्या

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर

सकाळ न्यूज नेटवर्क


पुणे : या वर्षीचा मान्सून सर्वत्रच जोरदार बरसत आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यानंतर सध्या बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी व गुरुवारी पुण्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. येथील अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा 15 झाला आहे. त्यामुळेच सर्वच नागरिक आता पाऊस थांबावा असा धावा देवाकडे करत आहेत. परंतू ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.

दरम्यान, स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून उशिरा दाखल झाला आहे, त्यामुळे तो परतीलाही उशिराच लागणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. पुढील काही दिवसांत मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर परतीच्या पावसापर्यंत सगळ्याच राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

दरम्यान, खरंतर परतीच्या पावसाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरू होते. पण यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊसही लांबणीवर गेला आहे. हवामानातील बदलामुळे पुढच्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा या भागांत पाऊस मुसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: return journey of the monsoon will be delayed skymet has said monsoon will go back in 2nd week of october
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT