बातम्या

वाचा | काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव

साम टीव्ही न्यूज

राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे. इंधनाचे दर रोज वाढत असताना रविवारी मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली होती. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत, या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं.

बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चालली आहे त्याविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने अर्थ्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे”.


गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. काँग्रेसने वाढत्या इंधन दरावरुन राज्यभरात आंदोलन पुकारलं असताना सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२ रुपये १० पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये ६४ पैसे झाला आहे. चेन्नईत सोमवारी पेट्रोलचा दर ८३ रुपये ६३ पैसे झाला असून डिझेल प्रतिलिटर ७७ रुपये ७२ पैशांना मिळत आहे.

WebTittle ::Read | What is the price of petrol-diesel


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT