बातम्या

 ट्रेनच्या डब्यात बसणार CCTV कॅमेरे

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: ट्रेनच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर प्रवाशांच्या प्रायव्हसीचा भंग होणार नाही, असे नायडू म्हणाले. हे कॅमेरे गाडीचे सर्व डबे आणि दरवाजांच्या वर लावण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या प्रायव्हसीशी कोणत्याही प्रकारची तडजोड करता येणारच नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले आहेरेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गांभिर्याने घेतला असून मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या ५८ हजार ६०० डब्यांमध्ये २०२२ पर्यंत कॅमेरे लावण्याची तयारी सुरू झाली आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. नायडू यांनी ही माहिती दिली. या सुरक्षा यंत्रणेसाठी कृत्रिम इंटेलिजनस आणि फेस रिकग्नायझेशन सॉफ्टवेअरचा वापर केला जाऊ शकतो, असेही नायडू यांनी सांगितले आहे. या द्वारे गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणे सोपे जाणार आहे. 
गुन्हेगारांना पकडण्यासाठी रेल्वे आधुनिक तांत्रिक प्रणालींच्या प्रयोगांवर जोर देत आहे. रेल्वे सुरक्षा दल चेहरा ओळख प्रणाली पद्धतीला गुन्हेगारांचे डेटा रेकॉर्डला जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. रेल्वे डबे आणि स्थानकांवर फिरणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे कृती कार्यक्रम तयार करत आहे.


या वित्तीय वर्षात रेल्वे दुर्घटनांमध्ये कोणत्याही प्रवाशाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडलेली नाही, अशी माहितीही रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली. तथापि, आर्थिक दृष्टीने विचार करता रेल्वेची स्थिती फार चांगली नसल्याचे नायडू यांनी मान्य केले आहे. या वर्षी रेल्वेचे ऑपरेटिंग प्रमाण १२१ टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ११३ टक्के इतके होते.


Web Title : railway planning to install cctv camras in coaches of all trains and railway stations by 2022
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Live Breaking News : कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान

Kolhapur Election: हळहळ! मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका, रांगेतच सोडला जीव

Gujrat News: अजब गजब... गणितात २०० पैकी २१२ अन् भाषेत २११ गुण; मुलीचं मार्कशीट व्हायरल

PM Narendra Modi: ...तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य खराब करताय!; PM मोदींनी मुस्लिम बांधवांना केलं सावध

SCROLL FOR NEXT