ajit pawar
ajit pawar 
बातम्या

Unlock breaking: पुण्याबाबत सोमवारी निर्णय होणार  

अमोल कविटकरसह संजय डाफ

उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. यामध्ये पुण्यातील अनलॉकबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आसपास आहे. तसेच पुणे ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्के आहे. पुढे ते म्हणाले लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. पुण्यातील अनलॉक बद्दल विचारले असता ते म्हणाले याचा निर्णय सोमवारी घेण्यात येईल. निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पुणे शहर, पिंपरी-चिंचवडबाबतीत वेगळा आणि पुणे ग्रामीणबाबतीत वेगळा निर्णय असेल असेही अजित पवार म्हणाले.  पुणे आणि खडकी कॅन्टोनमेंटला पुणे शहराची नियमावली लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पवार यावेळी म्हणाले. (Pune Unlock breaking:  will be decided on Monday; Ajit Pawar said ..)

पुणे लॉक असणार की अनलॉक याबात निर्णय सोमवारी होणार आहे. तसेच बंद असलेले सलून, ब्युटी पार्लरबाबत उघडण्याबाबत निर्णयसुद्दा येत्या सोमवारी घेण्यात येईल असते अजित पवार म्हणाले. येणाऱ्या पंढरीच्या वारी संदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. आम्ही वारकऱ्यांना पायी पालखी सोहळ्याबाबत अडचणी सांगितल्या. मात्र वारकऱ्यांचं म्हणणं आहे ५० लोकांना परवानगी द्या. पण पालखी सुरू झाल्यावर लोक दर्शनाला येतील. त्यामुळे गर्दी झाली की नियंत्रणात कशी येणार? असा प्रश्न अजित पवार यांनी केला आहे. 

 हे देखील पाहा

महाविकास आघाडीत एकत्र काम करत असताना आम्ही एकोप्याने रहायचे ठरवले आहे. ते खालीपर्यंत, जिथे थेट लढत झालीय तिथे मन एकत्र आणणे यासाठी प्रयत्न सुरु आहे. काही ठिकाणी पक्षाच्या अंतर्गत वाद होतात, खेडला तर राष्ट्रवादी-सेना आमने सामने होती असेही अजित पवार म्हणाले. मराठा आरक्षावरून नारायण राणेँच्या टीकेविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही दिलं मराठा आरक्षण? ही काय पद्धत आहे का?. पवार साहेबांनी ५० वर्षाच्या राजकारणात सर्व जातीधर्मांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.  राणेंना समजत नाही का? हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT