Skipping Rope Benefits: वजन कमी करण्यासाठी रोज करा स्किपिंग; फिटनेससह मिळतील हे ७ फायदे

Shruti Vilas Kadam

वजन कमी करण्यास मदत

सुरुवातीला दररोज २ ते ५ मिनिटे स्किपिंग करा. शरीराला सवय झाल्यानंतर हळूहळू १० ते १५ मिनिटांपर्यंत वेळ वाढवू शकता. दररोज १० मिनिटे स्किपिंग केल्याने शरीराचे वजन आणि व्यायामाचा वेग यानुसार अंदाजे ८० ते १४० कॅलरीज बर्न होऊ शकतात.

Skipping Benefits

हृदयाचे आरोग्य सुधारते

स्किपिंग हा कार्डिओ व्यायामाचा एक प्रकार आहे. नियमित स्किपिंग केल्याने हृदयाची कार्यक्षमता आणि शारीरिक सहनशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते.

Skipping Benefits

पायांचे स्नायू मजबूत होतात

स्किपिंग करताना पोटऱ्या, मांड्या आणि पायांच्या इतर स्नायूंवर कार्यरत होतात. नियमित स्किपिंगमुळे स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती वाढण्यास मदत होते.

Skipping Benefits

शरीराचा समतोल सुधारतो

दोरीवर उड्या मारताना हात आणि पाय यांच्यात योग्य समन्वय ठेवावा लागतो. त्यामुळे नियमित सरावाने शरीराचा समतोल सुधारण्यास मदत होऊ शकते.

Skipping Benefits

हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

स्किपिंग हा वजन पेलून केला जाणारा व्यायाम आहे. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी स्किपिंग उपयुक्त ठरू शकतो.

Skipping Benefits

शरीराची सहनशक्ती वाढते

नियमित स्किपिंग केल्याने श्वसन आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे दैनंदिन कामे करताना थकवा कमी जाणवतो आणि शरिराची क्षमता वाढते.

Skipping Benefits

कमी वेळेत जास्त फायदेशीर व्यायाम

स्किपिंग करण्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नसते. घरच्या घरी थोड्या जागेत दोरीच्या मदतीने हा व्यायाम करता येतो. सुरुवातीला कमी वेळ उड्या माराव्या हळूहळू वेळ वाढवावा.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Skipping Benefits

Mosambi Benefits: दररोज एक मोसंबी खा; त्वचेपासून आरोग्यापर्यंत मिळतील ७ फायदे

Mosambi Benefits
येथे क्लिक करा