Shruti Vilas Kadam
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे संतुलित आहारात मोसंबीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
मोसंबीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्याने ताजेतवाने वाटू शकते.
मोसंबीतील व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते. कोलेजन त्वचेची रचना टिकवण्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
मोसंबीमुळे शरीराला फायबर मिळते. फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.
मोसंबीतील व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे डाळी, कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्यांसोबत मोसंबी खाणे फायदेशीर ठरू शकते.
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सीसह अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले घटक असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर ठेवतात.
गोड पदार्थ किंवा पॅकेज्ड स्नॅक्सऐवजी मोसंबी खाल्ल्याने आहारात फळांचा समावेश वाढतो. फळाचा ज्यूस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.