Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लूक; मोरपंखी पैठणीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Shruti Vilas Kadam

निळ्या रंगाच्या पैठणीची निवड

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीच्या खास लूकसाठी निळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली आहे. साडीचा गडद निळा रंग तिच्या लूकला आकर्षक आणि पारंपरिक टच देत आहे.

Sonalee Kulkarni

साडीवरील सोनेरी नक्षीकाम

साडीवर असलेली सोनेरी फुलांची नक्षी आणि सुंदर जरीचा काठ तिच्या लूकचे खास आकर्षण आहे. या नक्षीकामामुळे साडीला रॉयल लूक मिळाला आहे.

Sonalee Kulkarni

मॅचिंग ब्लाऊजने वाढवली शोभा

निळ्या रंगाच्या साडीला मॅचिंग ब्लाऊजची जोड देण्यात आली आहे. साडी आणि ब्लाऊजचे सुंदर कॉम्बिनेशन सोनालीच्या पारंपरिक लूकला अधिक उठावदार बनवत आहे.

Sonalee Kulkarni

सिल्व्हर ज्वेलरीचा सुंदर साज

सोनालीने गळ्यात चांदीच्या रंगाचा आकर्षक चोकर नेकलेस घातला आहे. त्यासोबत मॅचिंग कानातले घालून तिने आपल्या लूकमध्ये साधेपणा आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुरेख मेळ साधला आहे.

Sonalee Kulkarni

कपाळावरील टिकलीने खुलला लूक

कपाळावर छोटीशी काळी टिकली, नॅचरल मेकअप आणि चेहऱ्यावरील ग्लोमुळे सोनालीचा लूक अधिक सुंदर दिसत आहे. तिने मेकअप साधा ठेवत पारंपरिक लूकला प्राधान्य दिले आहे.

Sonalee Kulkarni

हिरव्या आणि लाल बांगड्या

हातातील हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या निळ्या साडीला अधिक सुंदर बनवत आहेत. या छोट्या अॅक्सेसरीजमुळे तिच्या नवरात्री स्पेशल लूकमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीची झलक दिसते.

Sonalee Kulkarni

नवरात्रीसाठी परफेक्ट पारंपरिक लूक

निळी पैठणी, सोनेरी नक्षीकाम, चोकर आणि साधा मेकअप यामुळे सोनालीचा लूक नवरात्रीसाठी खास ठरत आहे. सणासुदीला पारंपरिक आणि एलिगंट दिसण्यासाठी तिच्या लूक रिक्रेएट करता येईल.

Sonalee Kulkarni

Tadasana Benefits: ऑफिसमध्ये एका जागी बसून काम केल्यामुळे पाठ खूप दुखते? मग १० मिनिटांसाठी करा 'हा' सोपा योगा

Tadasana Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा