Manasvi Choudhary
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत, चुकीचा आहार आणि प्रदुषणामुळे तरुण वयातच केस पांढरे होतात.
बाजारात केस काळे करण्यासाठी अनेक केमिकल्युक्त हेअर डाई मिळतात. मात्र यामुळे केस काळे होतात मात्र केसांची गुणवत्ता खराब होऊ शकते.
यासाठी केस काळे करण्यासाठी तुम्ही घरगुती सोपा उपाय करणे महत्वाचे आहे. केसांच्या काळेपणासाठी कढीपत्ता आणि खोबरेल तेलाचा वापर करा.
घरीच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे तेल बनवा सर्वप्रथम गॅसवर लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवा.
त्यात एक वाटी खोबरेल तेल आणि कढीपत्त्याची पाने एकत्र टाका.
हे सर्व मिश्रण मंद आचेवर चांगले कढवून उकळवून घ्या.
तेल चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे तेल हलके कोमट करून केसांच्या मुळांना लावा आणि बोटांच्या टोकांनी ५ ते १० मिनिटे लावून मालिश करा.