Manasvi Choudhary
सणासुदीला महिला विविध रंगाच्या साड्या नेसतात. तुम्हालाही स्टायलिश, हटके साडी खरेदी करायची असेल तर लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहूया.
पारंपारिक कार्यक्रमांसाठी किंवा लग्नासाठी गडद निळ्या रंगावर सोनेरी किंवा चांदीच्या जरीचे काम असलेली सिल्क साडी अत्यंत भव्य दिसते. यावर टिकली आणि आभूषणे परिधान केल्यास राजेशाही लुक मिळतो.
कॉकटेल पार्टी किंवा नाईट कार्यक्रमांसाठी सिक्विन वर्क असलेली निळी जॉर्जेट साडी तुम्ही निवडू शकता.
सध्या ऑर्गनझा साड्या खूप ट्रेंडमध्ये आहे. डार्क नेव्ही ब्लू बेसवर फिकट रंगाची फ्लोरल प्रिंट असलेली साडी तरुण मुलींना खूप आवडते. ही साडी एलिगंट आणि मॉडर्न लूक देते.
प्लेन रॉयल ब्लू सॅटिन साडी आणि त्यावर सिक्विन किंवा हेवी एम्ब्रॉयडरी वर्क असलेला ब्लाउज घातल्यास अत्यंत बोल्ड आणि स्टायलिश लुक दिसतो.
ऑफिस वेअरसाठी निळ्या रंगावर लाल, गुलाबी किंवा हिरव्या रंगाची कंट्रास्ट बॉर्डर असलेली चंदेरी साडी अतिशय सोबर आणि कम्फर्टेबल वाटते.