बातम्या

उल्हासनगरच्या महिलेने मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : मंत्रालयात पुन्हा एकदा एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. या जाळीवर या महिलेने उडी मारलीये. या जाळीवर उडी मारून महिलेने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. सुदैवाने या महिलेला कोणतीही गंभीर जखम किंवा दुखापत झालेली नाही. मंत्रालयात यापूर्वी देखील असे प्रयत्न करण्यात आले आहेत. म्हणूनच मंत्रालयात संरक्षक जाळी बसवण्यात आली. या सुरक्षा जाळी मुळे या महिलेचा जीव वाचलाय.       

प्रियंका गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारलीये. गेले अनेक दिवस वैद्यकीय सहाय्यता निधी मिळत नसल्याने ही महिला त्रस्त होती. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही महिला मंत्रालयात हेलपाटे घालत होती अशी माहिती समोर येतेय. म्हणूनच या महिलेने टोकाचं पाऊल उचललं. सदर महिला उल्हासनागरची असल्याची प्रथमिक माहिती आता समोर येतेय.     

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या महिलेला या संरक्षक जाळीवरून बाहेर काढण्यात आलंय. आता सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिची वैद्यकीय चाचणी सुरु आहे. गेल्या काही काळात मंत्रालयात अशा प्रकारच्या घटना वाढताना पाहायला मिळतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारची पहिलीच घटना आज मंत्रालयात घडलेली पाहायला मिळालीये.   

Webtitle : priyanka gupta tried to end her life in mantralaya mumbai

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी

Latur Rain Alert : लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रात्रीपासून पावसाची संततधार, जनजीवन विस्कळीत

KBC 17: एक अनोखा खेळ...; केबीसीच्या मंचावर भारतीय महिला आइस हॉकी संघाचा सन्मान, पाहा VIDEO

धक्कादायक! ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळलं, शिक्षकाचा अजब कारनामा, संतापजनक कारण समोर

Virar Building Collapse : विरार इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ५ लाखांची मदत जाहीर|VIDEO

SCROLL FOR NEXT