बातम्या

आता पोलिस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार

सकाळ न्यूज नेटवर्क

भवानीनगर - राज्यातील बहुप्रतीक्षित पोलिस भरती प्रक्रिया आजपासून (ता. ३) सुरू झाली. ऑनलाइन अर्ज भरण्यास सायंकाळपासून प्रारंभ झाला असून, येत्या २३ सप्टेंबरपर्यंत ते भरता येणार आहेत. राज्यात प्रथमच ऑनलाइन परीक्षा होणार असून, या प्रक्रियेत पोलिस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार आहेत. 

जागा कमी व परीक्षा ‘महापोर्टल’वरून असल्याने भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे. मागील वर्षापर्यंत सरासरी ८ लाख उमेदवारांनी पोलिस भरतीत भाग घेतला. अगोदर मैदानी चाचणीचे कमी केलेले गुण, त्याचे कमी केलेले महत्त्व, त्यानंतर परीक्षा महापोर्टलवर घेण्याचा निर्णय व ऑनलाइन परीक्षेमुळे गुणवत्तेला वाव नसल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका वेगवेगळ्या राहणार असल्याने कोणाला सोपा, तर कोणाला अवघड पेपर मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी दोन व विदर्भातीलही ११ जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे.


Web Title: police recruitment will be filled in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mankhurd Shawrma News | शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू, दोघांना अटक

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने

Hair Care Tips: केसांमधील गुंता कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Morning Excercise: सकाळी अर्धातास करा व्यायाम, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळ्याची SIT चौकशी करा, मुंबई हायकोर्टात याचिका; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT