Saam Banner Template 
बातम्या

थोपटे वाडीतील बेकायदेशीर बैलगाडा शर्यती प्रकरणी पोलिसांची कारवाई

विनोद जिरे

पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा मोटार सायकल जप्त केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक १३ जून रोजी थोपटेवाडी येथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना मिळाली होती. या नुसार थोपटेवाडी येथील बोलाईदेवीच्या पायथ्या लागत असलेल्या माळरानावर पोलीस गेले असता तेथे बैलगाडा शर्यत सुरू असल्याचे त्यांना आढळून आले. पोलीस गाडी आल्याचे पाहून बैलांना तिथेच सोडून लोकांनी तेथून पळ काढला.

हे देखील पाहा 

यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी दहा बैलगाडे व १२ मोटारसायकल आढळून आल्या आहेत. पोलिसांनी सर्व बैलगाडे व मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यानी घटना स्थळी भेट दिली असून आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात येत आहे.  तर आयोजका बरोबरच जागा मालकाची ही चौकशी करून  कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यानी सांगितले आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धुळ्यात वाढत्या तापमानाचा फटका पोल्ट्री व्यवसायाला

Mumbai local train: महाराष्ट्र दिनी रेल्वेचा मोठा निर्णय; एसी आणि नॉन एसी लोकल वाढल्या, कोणत्या मार्गावर किती लोकल धावणार? पाहा वेळापत्रक

Bra Changing Tips: महिलांनो, तुम्ही घालताय ती 'ब्रा' कधी बदलायची? जाणून घ्या, नाहीतर स्तनांवर होईल परिणाम

Marathi language: महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, सराकराने दिला थेट इशारा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध

SCROLL FOR NEXT