बातम्या

रेल्वेने प्रथमच होणार कांदा निर्यात

साम टीव्ही न्यूज

भुसावळ रेल्वे विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशात मालगाडीने कांदा निर्यात करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. भुसावळ रेल्वे विभागांतर्गत लासलगाव, निफाड व खेरवाडी या ठिकाणाहून कांदा बांगलादेशात पाठविण्यात येत असून, बुधवारी १७१० टन कांदा रवाना केल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. करोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन असताना व राज्यात अनेक ठिकाणी बाजार समित्या बंद असताना भुसावळ रेल्वे विभागातून बांगलादेशात मालगाडीने हजारो टन कांदा निर्यात करण्यात आला आहे. 

रेल्वेद्वारे आतापर्यंत बांगलादेशासाठी कधीही कांदा निर्यात झालेली नसल्याने लॉकडाउन काळात ही मोठी बाब असल्याचे सांगितले जात आहे. भुसावळ मंडलातून लासलगाव, निफाड, खेरवाडी या स्थानकांवरून कांदा बांगलादेशात निर्यात करण्यात येत आहे. लासलगाववरून बुधवारी ४२ वॅगनची पहिली रॅक (मालगाडी), निफाड आणि खेरवाडी स्थानकावरून गुरुवारी प्रत्येकी ४२ वॅगनच्या दोन रॅक रवाना झाल्या. रेल्वे प्रशासनातर्फे व्यापाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून मालवाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचे भुसावळ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.करोना संकटामुळे लॉकडाउनची घोषणा झाली व कांद्याची इतर देशांत निर्यात बंद झाली. आता ही निर्यात सुरू झाल्यानंतर भुसावळ रेल्वे विभागातून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशात कांदा पाठविण्यात येत असल्याचे चित्र आहे.

WebTittle ::Onion export for the first time by rail

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: विश्वजित कदम वाघ आहेत की नाही, 4 जूनला कळेल : संजय राऊत, Video

Water Issue in India : चिंता वाढली; देशातील १५० जलाशयांमधील पाण्याच्या पातळीत मोठी घट, दक्षिणेतील धरणे अर्धे रिकामे

Shirdi News: अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम; २४ वर्षात केले २३०० मुलींचे कन्यादान

Shukrawar Upay: शुक्रवारी महिलांनी करू नका ही कामे, माता लक्ष्मी होईल नाराज

Abijeet Patil News | अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरची जप्ती टळली, नुकताच केला होता भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT