बीडमध्ये घोषणाबाजी करत राष्ट्रवादी रस्त्यावर; चूल मांडून केला स्वयंपाक विनोद जिरे
बातम्या

बीडमध्ये घोषणाबाजी करत राष्ट्रवादी रस्त्यावर; चूल मांडून केला स्वयंपाक

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं, चूल मांडून स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - पेट्रोल Petrol डिझेल Diesel दरवाढी विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP वतीने बीडमध्ये Beed जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं, चूल मांडून स्वयंपाक करत आंदोलन करण्यात आले. यावेळी 'मोदी सरकारचा करायचं काय, खाली मुंडकं वर पाय' यासह केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला, पुरुषांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. असा इशारा राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव निळकंठ वडमारे यांनी दिला आहे.

हे देखाली पहा -

तसेच केंद्रातील मोदी सरकारने पेटोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोल 110 रुपये लिटरचा टप्पा पार करत असून डिझेल 95 रुपये लिटर झाले आहे. ही दरवाढ सामान्य माणसाच्या जीवनावर उठली आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. यामुळं तात्काळ केंद्र सरकारने भाव वाढ मागे घ्यावी. अशी देखील मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

SCROLL FOR NEXT