बातम्या

साताराचे खासदार उदयन राजे भोसलेंचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क


साताराचे खासदार उदयन राजे भोसले यांनी आज मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे.  महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे विद्यमान खासदार भाजपच्या गळाला लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठे आव्हान आहे. सातारा येथील लोकसभेची निवडणूक आता विधानसभेसोबत होते, की नंतर याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. मात्र या निवडणुकीत साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा निवडून आल्यास राष्ट्रवादीसाठी ती मोठी नामुष्की असेल.लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयन राजे यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते. 

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचे पटत नसले तरी, मुख्यत्वे राजकारणाचा बदलता पोत पाहूनच उदयनराजे भाजपच्या आसऱ्याला गेल्याचे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे आहे. यंदाची लोकसभा निवडणूक उदयनराजे यांनी जिंकून राष्ट्रवादीला आधार दिला. मात्र, त्यानंतर सातारचे त्यांचे चुलत बंधू व राजकीय विरोधक आ. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले. रामराजे नाईक निंबाळकर हे उदयनराजे यांचे विरोधकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राज्यात सन १९९५च्या युतीच्या राजवटीत दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनानुसार उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना महसूल राज्यमंत्री करण्यात आले होते. सातारचे राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद लेवे हत्या प्रकरणात ते अनेक दिवस अडकले होते. लोकसभेत तीनदा लोकप्रतिनिधित्व करणारे उदयनराजे यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी कधीच पटले नाही. उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील कलगीतुरा चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकमात्र अपवाद वगळता स्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे कधी जमलेच नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळी उदयनराजे यांचा पश्चिम महाराष्ट्रात फायदा होण्याऐवजी राजकीय उपद्रव वाढल्यामुळे भाजपने त्यांना दूर लोटले होते.

Web Title ncp mp udayanraje bhosle resign before joining bjp
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

SCROLL FOR NEXT