tiger death
tiger death 
बातम्या

यवतमाळात मुकुटबन वनपरिक्षेत्र मांगुर्ला जंगलात वाघिणीची हत्या केल्याची घटना .. 

प्रसाद नायगावकर

यवतमाळ: चार वर्षे वयाच्या वाघिणीची Tigress हत्या करून तिला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील पांढरकवडा Pandharkavda वनविभागांतर्गत मुकुटबन वनपरिक्षेत्रात काल रविवारी रात्री ही घटना  घडली आहे. तर, याच आठवड्यात टिपेश्‍वर Tipeshwar अभयारण्यात एका वाघाच्या पायाला तारेचा फास अडकून जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे जिल्ह्यातील वाघांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्तिथ केले जात आहे. Murder of tigress in Mangurla forest in Yavatmal

पांढरकवडा वनविभागअंतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील Mukutban forest reserve मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्र. 30 मध्ये वाघ मृत झाल्याची माहिती रविवारी रात्री मिळाली. सदर माहितीच्या आधारे सुभाष पुराणिक विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा, व्ही. जी. वारे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुटबन, प्रकाश महाजन प्रधान मुख्य वनसंरक्षक, डॉ. रमजान विराणी, मानद वन्यजीव रक्षक, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि वस्तुस्थितीची पाहणी केली. 

सदर जागेची तपासणी केली असता, ती वाघीण नाल्याला लागून असलेल्या गुहेत मृतावस्थेत आढळून आली. गळ्यात तारेचा फास अडकवला होता. तसेच बेदमपणे हत्याराने तिच्यावर वार करण्यात आले होते. आणि गुहेच्या तोंडाशी लाकडांनी आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.  तपासणी केली असता या वाघिणीचे वय चार वर्षे असण्याची शक्यता आहे. Murder of tigress in Mangurla forest in Yavatmal

वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडून नेल्याचे पंचनाम्यात दिसून आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर, डॉ. अरुण जाधव, वणी, डॉ. एस. एस. चव्हाण, झरी, डॉ. डी. जी. जाधव, मुकुटबन आणि डॉ. व्ही. सी. जागडे, मारेगाव यांचे मार्फत शवविच्छेदन Post mortem करण्यात आले आहे. शवविछेदन केल्यावर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Washim News : वाढत्या तापमानामुळे पद्म तलावातील माशांचा मृत्यू; तलावातील पाणी आटले

SCROLL FOR NEXT