monkey pox.jpg
monkey pox.jpg 
बातम्या

मंकीपॉक्स : ब्रिटनमध्ये नव्या आजाराचे संकट

वृत्तसंस्था

ब्रिटनमधील Britain नॉर्थ वेल्समध्ये North Wales मंकीपॉक्सची Monkeypox दोन प्रकरणे आढळली आहेत. दोन्ही रुग्णांना यूकेच्या UK बाहेर संक्रमण झाले असण्याची शक्यता आहे. या दोन्ही रुग्णांचे परीक्षण केले जात असून त्यांना या आजारचे संक्रमण कसे झाले आणि या संक्रमणाचा प्रसार कसा होतो हे शोधून काढले जात आहे. अशी माहिती वेल्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे संक्रमित रुग्णाकडून निरोगी व्यक्तीला संक्रमण होण्याचा धोकाही कमी असल्याचा दावा वेल्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.  (Monkeypox: New disease crisis in Britain) 

- मंकीपॉक्स म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटने WHO च्या मते, मंकीपॉक्स एक झुनोटिक व्हायरल Zoonotic viral रोग आहे. म्हणजेच हा विषाणू संक्रमित प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत पोहोचतो. त्यातील बहुतेक प्रकरणे मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या पावसाच्या जंगलात आढळतात. मंकीपॉक्स विषाणू संक्रमित प्राण्याच्या रक्ताच्या, घामाच्या किंवा लाळेच्या संपर्कात आल्यास  मानवांमध्ये या रोगाचे संक्रमण होते.  तज्ञांच्या मते, मंकीपॉक्स विषाणू चेचकच्या गटाशी संबंधित आहे.

- मंकीपॉक्स ही लक्षणे दिसल्यास सावध रहा
मंकीपॉक्सची लक्षणे चेचकच्या लक्षणांप्रमाणेच आहेत. म्हणजेच त्वचेवर फोड व पुरळ, ताप, डोकेदुखी, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा जाणवल्यास सतर्क रहा. ही मंकीपॉक्स विषाणूची लागण होण्याचीच लक्षणे आहेत. 

- संसर्ग झाल्यानंतर 1 ते 5 व्या दिवशी पुरळ दिसू लागतात 
यूकेच्या आरोग्य एजन्सी एनएचएसच्या मते, संक्रमणानंतर 1 ते 5 दिवसांनी त्वचेवर पुरळ उठते. हे त्याचे प्रारंभिक लक्षण आहे. या पुरळ चेहऱ्यावरुण  हळूहळू शरीराच्या इतर भागात पसरतात. या पुरळ हळूहळू फोडांमध्ये बदलतात आणि त्यात द्रव भरला जातो.

- मृत्यूचा धोका 11 टक्क्यांपर्यंत वाढतो 
डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्सच्या बाबतीत मृत्यूचा धोका 11 टक्क्यांपर्यंत आहे. चेचकपासून बचावासाठी 'व्हॅक्सीन इम्यून ग्लोबुलिन' नावाची लस वापरली जाते. एकाच गटाचा विषाणू असल्यामुळे, तीच लस रूग्णाला मंकीपॉक्सच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लागू केली जाते.

- हा विषाणू प्रथमच 1970 मध्ये सापडला होता
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये 1970  मध्ये सर्वप्रथम हा विषाणू आढळला. त्यानंतर हळूहळू हे जगातील अनेक देशांमध्ये पसरले. 2003 मध्ये अमेरिकेत सर्वप्रथम याची प्रकरणे नोंदली गेली.  

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT